3.5 C
New York

Rupali Chakankar : ईव्हीएमची ‘पूजा’ चाकणकरांना भोवली

Published:

पुणे

राज्यात तिसऱ्या टप्प्यात एकूण 11 लोकसभा मतदारसंघांकरिता (Loksabha Elections) निवडणूक आज पार पडली. मतदानादरम्यान बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघातील मतदान केंद्रावर राज्याच्या महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी चक्क ईव्हीएम मशीनची (EVM Machines) पूजा केली आहे. रूपाली चाकणकर यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा (FIR Filed) दाखल करण्यात आला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला परिसरातील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनची रूपाली चाकणकर यांनी पूजा केल्याने नवीन वाद सुरू झाला आहे निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या विरोधात पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्व प्रकाराची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. ईव्हीएम मशीनची पूजा करतानाचा रुपाली चाकणकर यांचा फोटो राज्यभर एकदम व्हायरल झाला. त्यावरुन समाज माध्यमावर उलटसुलट चर्चा सुरु आहेत. तिसऱ्या टप्प्यात अजित दादांचा डायलॉग, सुप्रिया सुळे यांचे अजित दादांच्या घरी जाणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची ईव्हीएम पूजा यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तर काहींनी या प्रकारावर नाक मुरडलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img