23.1 C
New York

Kanakalath dies: २५० हुन अधिक चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्रीचं निधन

Published:

प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री कनकलथा (Kanakalath) यांचे सोमवारी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. तिरुवनंतरपुरम मधील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे (Kanakalath dies). वयाच्या ६३ व्या वर्षी त्या काळाच्या पडद्याआड गेल्या. डिमेंशिया नावाच्या आजारापासून कनकलथा या गेल्या ३ वर्षांपासून त्रस्त होत्या. त्यांचे निधन डिमेंशिया ह्या आजारामुळेच झाल्याचे वृत्त आहे.


गेल्या ३ वर्षांपासून त्या गंभीर आजारी होत्या. निद्रानाश आणि स्मृतिभ्रंश झाल्याने कनकलथा गंभीर आजारी झाल्या होत्या. त्यांना झोपेसंबंधित हा आजार होता. २०२२ मध्ये त्यांना डिमेंशिया नावाच्या आजाराचे निदान झाले होते. मल्याळम चित्रपटसृष्टी हादरून गेली आहे. कनकलथा यांच्या निधनाचे वृत्त कळताच, मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

सई ताम्हणकर पुन्हा झळकणार हिंदीत!

लाखो चाहत्यांनी श्रध्दांजली वाहली. तसेच अनेक कलाकारांनी देखील शोककळा व्यक्त केली आहे. विविध भाषांमध्ये तब्ब्ल २५० हुन अधिक चित्रपटात कनकलथा यांनी काम केले आहे. विविध मालिका, नाटक, शोमध्ये काम करून प्रेक्षकांची माने जिंकली आहेत. गेल्या ३८ वर्षांपासून कनकलथा सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी १९७८ मध्ये अभिनय विश्वात पदार्पण केले. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी लग्न केले आणि लग्नाच्या १६ व्या वर्षी घटस्फोट घेतला. त्यांनी अनेक चित्रपट, मालिका तसेच रिऍलिटी शो केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img