8.4 C
New York

Voter ID Card: मतदानासाठी कोणते १२ पुरावे धरले जातील ग्राह्य?

Published:

भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मतदानासाठी जर मतदान छायाचित्र ओळख (Voter ID Card) जवळ नसल्यास अन्य 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखवला तर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. राज्यातील ११ मतदारसंघात 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. दिवसे यांनी ही माहिती दिली आहे. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे असे मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदारांनी मतदार ओळखपत्र सादर करावेत.


कोणते १२ पुरावे धरले जातील ग्राह्य?
१. पारपत्र (पासपोर्ट)
२. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
३. केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र
४. बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक
५. पॅन कार्ड
६. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड
७. मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र
८. संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड
९. आधार कार्ड
१०. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र
११. कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
१२. निवृत्तीवेतनाची दस्तावेज

मतदान कराच पण… पंतप्रधानांनी माध्यमांना दिला मोठा सल्ला

हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना कोणतेही १२ पुरावे सादर करावे किंवा मतदार माहिती चिठ्ठी आणि मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत न्यावे. असे आवाहनही निवडणूक आयागोकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img