3.8 C
New York

Dattatraya Bharane : दत्तामामा का भडकले, नेमकं काय घडलं?

Published:

इंदापूर

लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Elections) बिगुल वाजलं तेव्हापासूनच बारामती लोकसभा मतदारसंघ विशेष चर्चेत होता. नणंद-भावजय लढतीमुळे संपूर्ण राज्याचंच नाहीतर देशाचंही लक्ष या मतदारसंघाकडे लागलं आहे. आज बारामतीत लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडतंय. अशातच मतदान प्रक्रिया सुरू असतानाच एका व्हिडीओनं प्रचंड धुमाकूळ घातला आहे. आमदार दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharane) यांच्या व्हायरल व्हिडीओ. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ केलेला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दत्तात्रय भरणे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ देताना दिसत आहे. हा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

इंदापूरमधील हा व्हिडीओ असून यामध्ये दत्तात्रय भरणे यात शिवीगाळ करत असल्याचं दिसत आहे. सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते नाना गवळी यांना दत्तात्रय भरणेंनी शिवीगाळ केल्याचं पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडीओ रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आणि संपूर्ण राज्यभरात चर्चांना उधाण आलं.

रोहित पवार यांच्या पोस्टमध्ये काय

केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत… ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही!

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img