23.1 C
New York

Ajit Pawar : रोहित पवारांच्या त्या टीकेवर अजितदादांचं प्रतिउत्तर

Published:

राज्यात आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होतंय. महाराष्ट्रात 11 मतदारसंघात मतदान पार पडतयं.. बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी अजित पवारांसह (Ajit Pawar) कुटुंबासोबत आपला मतदानाचा हक्क बजावला.अजितदादा मतदानाला आले, त्यावेळी त्यांची आई आणि पत्नीसोबत होती. यावेळी अजित पवार यांनी ‘मेरी माँ मेरे साथ हैं!’ असं म्हटलं. त्यांच्या या डायलॉगची सर्वत्र चर्चा आहे. त्यांचा हा डायलॉग अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या ‘दीवार’ सिनेमाशी जोडला जात आहे. “कुठलीही निवडणूक मी महत्त्वाचीच मानतो. आमचं काम पाहून लोक आम्हाला पाठिंबा देतील असा विश्वास आहे” असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar तो व्हिडीओ कालचा होता का?

धारशिव आणि बारामती लोकसभा मतदार संघात मध्यरात्रीपासून आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात रात्रीच टि्वट केले. मध्यरात्रीपर्यंत पैसे काढण्यासाठी बँक सुरु असल्याचा रोहित पवारांनी आरोप केला. दरम्यान या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार उत्तर दिले. अजित पवार यांनी वेल्ह्यात पैसे वाटल्याचा आरोप फेटाळत म्हणाले, हे काम निवडणूक आयोगाचे आहे.मी सात विधानसभा लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. आजपर्यंत असे मी कधी केले नाही आणि करणार नाही. “हा खोटा आरोप आहे. त्यांनी पैसे वाटले असतील. मी असले धंद केले नाहीत. निवडणूक आयोगाने चौकशी करावी” असं अजित पवार म्हणाले. जिल्हा मध्यवर्ती बँक उघडी असल्याचे कोणी पाहिले का? तो व्हिडीओ कालचा होता का? याची कोणी शाहनिशा केली का? असे सवाल देखील उपस्थित केले.

पंतप्रधान मोदींनी रेवण्णा प्रकरणी मांडले परखड मत

कुटुंबियांचा सपोर्ट नाही असं म्हटलं जात होतं, पण तुमची आई सोबत होती, त्यावर अजित पवार म्हणाले की, “पवार कुटुंबात सगळ्यात मोठी माझी आई आहे. माझी आई माझ्यासोबत आहे. बाकीच्यांचा काय विचार करताय ‘मेरी माँ मेरे साथ हैं!” तुमच्या भावाला तुम्हाला मिशी काढलेलं बघायचय, त्यावर अजित पवार म्हणाले की, “त्याने 10 वर्षापूर्वी मिशी काढली. तो आता माझी वाट बघतोय. अजून तो कसली कसली वाट बघतोय ते मी पाहणारच आहे” ‘

Ajit Pawar अजित पवारांचे सख्खे बंधु श्रीनिवास पवार काय म्हणाले?

‘मेरी माँ मेरे साथ हैं!” या अजित पवारांच्या डायलॉगवर त्यांचे सख्खे बंधु श्रीनिवास पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवार भाजपासोबत गेल्यापासून डायलॉगबाजी करत आहेत. अजित पवारांनी 86 वर्षाच्या आईला राजकारणात ओढायला नको होतं” असं श्रीनिवास पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img