21 C
New York

Ghatkopar : गुजराती सोसायटीत मराठी उमेदवाराला प्रचारास विरोध, ठाकरे गट आक्रमक

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे. मुंबई (Mumbai) उपनगरात शेवटच्या पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वी मुंबईत गुजराती (Gujarati) विरुद्ध मराठा (Marathi) वाद पेटला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे (Thackeray Group) ईशान्य मुंबई लोकसभा (Mumbai North East Loksabha) मतदारसंघाचे उमेदवार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्या प्रचारार्थ दरम्यान घाटकोपर (Ghatkopar) मधील गुजराती समाजाच्या सोसायटीमध्ये (Gujarati Society) ठाकरे गटाच्या उमेदवारांना प्रचार करण्यास बंदी घातल्याने निवडणुकीच्या (Loksabha) तोंडावर मराठी विरुद्ध गुजराती वाद पुन्हा भेटण्याची शक्यता आहे.

मुंबईसह उपनगरात पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. आज पाचव्या टप्प्याकरिता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आखरीचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय दिना पाटील घाटकोपर मध्ये प्रचार करण्यासाठी केले असता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोसायटीच्या आवारात येण्यापासून मज्जाव करण्यात आला तुम्हाला सोसायटी प्रचार करता येणार नाही असे सोसायटीच्या लोकांकडून सांगण्यात आल्याचे ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या म्हणणे आहे.  त्यामुळे आता मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती वाद पेटण्याची शक्यता आहे.

शिवसेना उबाठाचे शिवसैनिक संजय दिना पाटील यांचा प्रचारासाठी घाटकोपरमध्ये गेले. त्यावेळी मराठी पत्रके वाटण्यास त्यांना विरोध करण्यात आला. मराठी माणसांना बिल्डींगमध्ये प्रचार करु देणार नाही असे सांगण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. सोसायटीत आम्ही परवानगी घेऊन प्रचार करत आहोत असे त्यांनी सांगितले त्यानंतर वाद सुरु होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img