23.1 C
New York

Sai Tamhankar : सई ताम्हणकर पुन्हा झळकणार हिंदीत!

Published:

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री साई ताम्हणकरसाठी (Sai Tamhankar) २०२४ हे वर्ष खास आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यापासूनच सईच्या नव्या प्रोजेक्टला उधाण आलंय. “श्री देवी प्रसन्न”, “भक्षक”, “डब्बा कार्टेल” आणि “ग्राऊंड झिरो” या प्रोजेक्टसनंतर लवकरच ती आणखी एका नव्या प्रोजेक्टसमधून ती पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी, सईने ‘अग्नी’ आणि ‘ग्राउंड झिरो’ या दोन आगामी प्रोजेक्ट्सची घोषणा केली होती. “आंतरराष्ट्रीय फायर फायटर दिना” निमित्त सईने “अग्नी”चं पोस्टर शेअर केलं आहे.

बॉलीवूड (Bollywood) विश्वात सईचं २०२४ हे वर्ष सुखनमय ठरतंय. एका पाठोपाठ एक अशा नव्या प्रोजेक्टसची ती घोषणा करत आहे. “भक्षक” या हिंदी वेब शोनंतर आता सई “अग्नी” साठी सज्ज होत आहे. ‘अग्नी’ या चित्रपटात सईसह प्रतीक गांधी, जितेंद्र जोशी, दिवेंद्यू, सयामी खेर अशी तगडी स्टाकास्ट आहे. प्रतीक गांधी या बड्या कलाकारांसोबत सई या आगामी “अग्नी” चित्रपट मध्ये झळकणार आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटचा हा चित्रपट आहे.

अनन्या आणि आदित्य यांच ब्रेकअप? नेमकं प्रकरण काय?

‘ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ या व्यतिरिक्त सई ‘डब्बा कार्टेल’ मध्ये सुद्धा दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर ‘डब्बा कार्टेल’ या वर्षाच्या शेवटापर्यंत प्रदर्शित होणार आहे. एक्सेल एंटरटेनमेंटसोबत सईचा हा तिसरा प्रोजेक्ट असणार आहे. या चित्रपटात शबाना आझमी, ज्योतिका शालिनी पांडे, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता यांसारख्या धमाकेदार कलाकारांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img