शंकर जाधव, डोंबिवली
कल्याण लोकसभा (Kalyan Loksabha) मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र याच पक्षातील माजी महापौर रमेश जाधव (Ramesh Jadhav) यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. अखेर जाधव यांनी सोमवार 6 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या चर्चा पूर्णविराम मिळाला आहे.
रमेश जाधव यांनी 3 तारखेला डोंबिवलीत अपक्ष म्हणून उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरला होता.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितल्याचे जाधव यांनी पत्रकारांना सांगितले होते. जाधव यांनी हा अर्ज भरल्याने अनेक पक्षात चर्चा सुरु झाली होती. सोमवारी जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना जाधव म्हणाले, पक्षाकडून मिळेलेल्या आदेशानुसार मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता व पक्ष श्रेष्टीचा आदेश आल्यावर मी उमेदवारी अर्ज मागे घेतला. वैशाली दरेकर याच महाविकास आघाडीच्या कल्याण लोकसभेसाठी अधिकृत उमेदवार असल्याचे त्यांनी जाहीर केले.