7.8 C
New York

Prakash Ambedkar : भाजपला घरी बसवण्याची हीच योग्य संधी- आंबेडकर

Published:

पुणे

देशभरातील मतदानाची (Loksabha Election) घसरती टक्केवारी चिंतेचा विषय असून, भाजपने (BJP) लोकांचा अपेक्षाभंग केल्याने मतदानाचे प्रमाण घसरत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला. या वेळी भाजपला घरी बसवण्याची संधी आली असून, मुस्लिम समाजाने ही संधी घालवू नये असे आवाहन त्यांनी केले. शिरूर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अन्वर शेख यांच्या प्रचारासाठी आज हडपसर येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते .

आंबेडकर म्हणाले की, राज्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर कोणत्याही पक्षाने मुस्लीम समाजाला उमेदवारी दिली नाही त्यावरून या पक्षाचा खरा चेहरा समाजाने ओळखावा. वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम समाजाला उमेदवारी देऊन या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे ठरवले आहे असेही त्यानी स्पष्ट केले.

आज भाजपला हरवण्याची ताकत मुस्लिम समाजात असून, त्यांनी आता वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेण्याचे आवाहन आंबेडकर यांनी केले.

या वेळी मुस्लिम समाजाच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉ. अन्वर शेख म्हणाले की, आज मुस्लिम समाज अतिशय दुर्लक्षित आणि उपेक्षित झाला आहे. आता या समाजाला फक्त वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर न्याय देऊ शकतात. त्यामुळे मी नोकरीचा राजीनामा देऊन वंचित बहुजन आघाडीत सामिल झालो आहे असे ते म्हणाले .
           
या सभेस वंचित आघाडीचे ॲड. अरविंद तायडे, प्रदेश युवक नेते विशाल गवळी, जिल्हाध्यक्ष राज कुमार, विश्वास गदादे, कमलेश उकीरडे तसेच प्रदेश आणि पुणे शहर व जिल्हा प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या सभेला मोठ्या संख्येने महिला आणि युवक सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img