नुकतीच मुंबईत (Mumbai) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वीज बिलाच्या वादातून एका इसमाने आपल्याच घरमालकाची हत्या (Crime) केल्याची खळबळजनक घटना गोवंडीत घडली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी ६३ वर्षीय आरोपीला अटक केली असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाती आलेल्या वृतानुसार, अब्दुल शेख (वय 63) असे आरोपीचे नाव असून, गणपती झा (वय 49) असे मृताचे नाव आहे. तो बैंगनवाडीत वास्तव्यास होता. गुरुवारपासून बैंगनवाडी येथील त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. झा यांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
मुलगा जखमी झाल्याचे समजताच मुख्यमंत्री स्वतः मुलाला घेऊन रुग्णालयात
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी शेजारी आणि कुटुंबीयांचीही चौकशी सुरू केली. त्यानंतर त्यांना मृताचा भाऊ दिनेशकडून महत्त्वाची माहिती मिळाली. काही दिवसांपूर्वी गणपतीचे भाडेकरू अब्दुल शेख याच्याशी भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अब्दुलला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
गणपती आणि भाडेकरू अब्दुल यांच्यात वाद
30 एप्रिल रोजी गणपती आणि भाडेकरू अब्दुल यांच्यात वाद झाला होता. वाढत्या वीजबिलावरून त्यांच्यात भांडण झाले. भांडणात गणपतीने अब्दुलला शिवीगाळ केली. रागाच्या भरात अब्दुल शेख याने गणपतीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तेव्हा स्वतःचा बचाव करण्यासाठी गणपतीने प्रतिकार केला. मात्र आरोपी अब्दुल यानी याने घरमालक गणपतीच्या तोंडावर हातोड्याने वार केला, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. अब्दुल शेख त्यांना तसाच सोडून गेला. जखमी अवस्थेत गणपतीचा मृत्यू झाला. दोन दिवसांनी दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले आणि खुनाचा गुन्हा उघडकीस आला.