बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) नेहमीच चर्चेत असतो. कधी आगामी चित्रपटावरून तर कधी ट्रॉलिंगमुळे करण जोहर चर्चेत असतो. एका टीव्ही शोमध्ये करण जोहारची नक्कल आली असून त्यावर त्याने नाराजी केली आहे. प्रसिद्ध कॉमेडियन केतन सिंगने (Ketan Singh) करण जोहरची नक्कल केल्याने तो निराश झाला आहे. केतन सिंगने केलेल्या नकलीबदल करणने सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. केतन सिंगच्या कृत्याबद्दल बोलताना करण म्हणाला, हा माझा अनादर आहे.
रविवारी संध्याकाळी, करण जोहरने माहिती शेअर करत संताप व्यक्त केला आहे. या वेळी करण म्हणाला, ”मी माझ्या आईसोबत टीव्ही पाहत होतो, आणि एका चॅनेलवर एका रिऍलिटी कॉमेडी शोचा प्रोमो पहिला. त्यात एका कॉमेडियन माझी अत्यंत खराब नक्कल करत होता. ” अशा शब्दात कॉमेडियन केतन सिंग विषयी कारण जोहरने वक्तव्य केलं आहे. याचसोबत करण जोहर २५ वर्ष सिनेइंडस्ट्रीत असून देखील त्याच्या विषयी केलेल्या अनादराबदल करणने खंत व्यक्त केली आहे.
अनन्या आणि आदित्य यांच ब्रेकअप? नेमकं प्रकरण काय?
करण जोहरच्या या नक्कलीबदल दिग्दर्शक-निर्माती एकता कपूरने (Ekta Kapoor) देखील खंत व्यक्त केली आहे. हा वाद वाढत असल्यामुळे केतनने करणची माफी मागितली आहे. यासोबतच आपली भूमिका देखील स्पष्ठ केली आहे. केतनने एका पोस्टमध्ये लिहिले कि, “मी करण सरांची माफी मागू इच्छितो. सर्वप्रथम, मी कोणतीही mimicry करतो, कारण मी कॉफी विथ करण शोमध्ये करण जोहरला खूप पाहिलं, मी त्याच्या कामाचा चाहता आहे. मी त्याचा चित्रपट, रॉकी और रानी की प्रेम कहानी ५ ते ६ वेळा पाहिला आहे, मी त्याच्या कामाचा आणि शोचा खूप मोठा चाहता आहे.” असं म्हणत केतनने करणची माफी मागितली आहे.