नवी दिल्ली
भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda), भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय आणि कर्नाटक भाजप अध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. काँग्रेसने (Congress) निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपने सोशल मीडिया पोस्टद्वारे एससी-एसटी समुदायाच्या लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.
रविवारी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने निवडणूक आयोग आणि बंगळुरू पोलिसांकडे आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत अहवाल दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप नेत्यांविरुद्ध लोकप्रतिनिधी कायदा आणि आयपीसीच्या कलम 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.