ICSE ISC बोर्ड (ICSE ISC Result) इयत्ता 10वी आणि 12वी २०२४ चे निकाल आज म्हणजेच 6 मे रोजी जाहीर होणार आहेत. कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) बोर्डाची परीक्षा मार्च महिन्यात पार पडल्या होत्या. विद्यार्थीं परीक्षांच्या निकालांची आतुरतेने वाट पाहत आहेत. १०वी च्या परीक्षा २८ मार्चला संपल्या तर इयत्ता १२वी च्या परीक्षा ३ एप्रिलला समाप्त झाल्या. विद्यार्थ्यांना निकाल https://cisceboard.org/ या वेबसाईटवर पाहता येणार आहे.
दहावी, बारावीचा निकाल ‘या’ तारखेनंतर
CISCE चे मुख्य कार्यकारी जोसेफ इमॅन्युएल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. २०२४ पासून ICSE आणि ISC च्या कंपार्टमेंट परीक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. २०२३ मध्ये, इयत्ता 10 वीच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 98.94 टक्के होती, तर 12वीसाठी ती 96.93 टक्के होती. इयत्ता 10वी आणि 12वी या दोन्ही परीक्षांमध्ये मुलींनी मुलांपेक्षा बाजी मारली. इयत्ता 10 वी साठी, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 99.21 टक्के होते, तर मुलांचे प्रमाण 98.71 टक्के होते. इयत्ता 12वीमध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 98.01 टक्के होते, तर मुलांचे प्रमाण 95.96 टक्के होते.
ICSE ISC इयत्ता 10वी, 12वी निकाल 2024 थेट: निकाल तपासण्यासाठी:
1) CISCE च्या अधिकृत वेबसाइटवर जा: www.cisce.org.
२) मुख्यपृष्ठावर ICSE बोर्ड परीक्षा निकाल 2024 किंवा ISC बोर्ड परीक्षा निकाल 2024 वर क्लिक करा.
३) तुमचा कोर्स कोड ICSE/ISC म्हणून निवडा.
4) युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅप्चा सारखी तुमची लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा.
5) सबमिट वर क्लिक करा.
6) परिणाम आता स्क्रीनवर प्रदर्शित होईल. सर्व तपशील क्रॉस-चेक करा.
7) निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट घ्या.
06 मे 2024, सकाळी 10:37:57 IST
ICSE ISC इयत्ता 10वी, 12वी निकाल 2024 थेट: तपासण्यासाठी वेबसाइट्स