8.3 C
New York

Gurucharan Singh: गुरुचरण सिंगच्या वडिलांची प्रतिक्रिया; केला मोठा खुलासा…

Published:

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) दोन आठवड्यांपासून बेपत्ता आहे. २२ एप्रिलपासून तो बेपत्ता झाला असून त्याच्या वडिलांनी २६ एप्रिलला पोलीस स्थानकात तक्रार केली. अद्याप त्याच्याबद्दल काहीच माहिती मिळालेली नाही. त्याचे वडील हरगीत सिंग चिंता व्यक्त करत आहे. तो सापडला नसलेल्याने वडिलांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

गुरुचरणच्या वडिलांने एका मुलाखतीत गुरुचरणच्या अचानक रितीने बेपत्ता होण्याबद्दल कुटुंबियांसाठी खूप धक्कादायक असल्याचं सांगितलं. हि परिस्थिती कशी हाताळायची हे समजतं नसल्याचं त्यांनी व्यक्त केलं. हरगीत सिंग म्हणाले, “आम्ही सगळे खूप चिंतेत आहोत आणि पोलिसांकडून गुरुचरणची काही अपडेट मिळेल, याची वाट पाहत आहोत. आम्ही त्याच्या परत येण्याची वाट पाहत आहोत.”

‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ होणार ऑफ एअर! तर घडलं असं…


२२ एप्रिलला गुरुचरण बेपत्ता झाला त्याआधी त्याची शेवटची पोस्ट वडिलांसोबत होती. त्याने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त काही फोटोंची एक रील पोस्ट केली होती आणि कॅप्शनमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यादिवसाची आठवण सांगत हरगीत म्हणाले, “आम्ही त्यादिवशी सेलिब्रेशन केलं नव्हतं. सर्वांनी घरातच वेळ घालवला होता.”


२२ एप्रिलला घरातून विमानतळावर जाण्यासाठी निघाला होता. तो मुंबईला जाणार होता, पण तो मुंबईला पोहोचला नाही आणि घरी देखील परतला नाही. तीन दिवस त्याच्यासोबत संपर्क होता नसल्याने त्याच्या वडिलांनी दिल्लीतील पालम पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे अद्याप कोणतीही अपडेट समोर आली नाही.


याबाबत दिल्लीतील अनेक भागात गुरुचरण पाठीवर बॅग घेऊन चालत फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. गुरुचरणच्या मोबाईल डिटेल्स तपासल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण २४ एप्रिलपर्यंत दिल्लीतच होता, यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. २४ तारखेला तो पालम येथील त्याच्या घरापासून फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावर होता. त्याने जवळच्याच एटीएममधून सात हजार रुपये काढले होते. त्यामुळे अभिनेत्याच अपहरण झाल्याची चर्चा सुरु आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img