3.6 C
New York

Dombivli : जीएम प्रीमियर लीग स्पर्धेत जीएम लिटिल स्टार संघ विजेता

Published:

डोंबिवली

डोंबिवली (Dombivli) मधील जीएम क्रिकेट अकॅडमीच्या वतीने दरवर्षी जीएम प्रीमियर लीग क्रिकेट सामने भरविले जातात. याही वर्षी मुख्य प्रशिक्षक गोपाल श्रीयान यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभारखानपाडा, गणेश घाट मैदान,डोंबिवली पश्चिम येथे जीएम पीएल क्रिकेट सामने आयोजित केले होते.

या जीएमपीएल क्रिकेट सामन्याचे वर्ष सहावे आहे. या क्रिकेट सामन्यांमध्ये 10 वर्षे, 12वर्षे व 14 वर्षे च्या आतील वयोगटातील मुलांसाठी क्रिकेट सामने आयोजित केले गेले होते. गेले आठवडाभर हे सामने बघायला मिळाले. यामध्ये 10 वयोगटातील मुलांमध्ये जीएम लिटिल बॉईज व जीएम लिटिल स्टार हे दोन संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचले व अखेर जीएम लिटिल स्टार हा संघ विजेता घोषित ठरला तर 12 वयोगटातील मुलांमध्ये जीएम इंडियन व जीएम रॉयल्स हे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत बघायला मिळाली यामध्ये जीएम रॉयल संघ विजेता ठरला तर 14 वर्षाच्या मुलांमध्ये जीएम टायगर व जीएम पॅंथर हे संघ अंतिम फेरीत पोहोचले या दोन्ही संघांमध्ये जीएम टायगर हा संघ विजेता ठरला. जीएमपीएल क्रिकेट सामने यशस्वी होण्यासाठी प्रमुख प्रशिक्षक श्री गोपाल श्रीयान यांच्यासोबतच जी एम क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक सुनील श्रीयान, मंदार तांबे , पठाण , अशोक बंजान, संतोष जोशी, मुकेश चव्हाण, प्रवीण शिणघे यांचा देखील मोलाचा वाटा आहे.

जीएम क्रिकेट अकॅडमी चे मुख्य प्रशिक्षिक श गोपाल श्रीयान हे असून सध्या त्यांच्या अकॅडमीमध्ये 200 हून अधिक मुले क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहेत. आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून उत्तम फलंदाज, उत्तम गोलंदाज तयार व्हावेत आणि युवा पिढीने क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करावी हा गोपाल यांचा उद्देश आहे. काही दिवसापूर्वी डोंबिवली कॅम्पमधून जीएम क्रिकेट अकॅडमी मधील पाच मुले मुंबई क्रिकेट अकॅडमी ( MCA) मध्ये निवड करण्यात आली आहे. त्यामूळे जीएम क्रिकेट अकॅडमी चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img