रविवारी (५ मे) रोजी ठाण्यात प्रचार सभा पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) प्रचारासाठी ठाण्यात दाखल झाले. महायुतीने ठाण्यातून शिवसेनेचे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना उमेदवारी दिली आहे. तर ठाकरे गटाने राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे. प्रचारा दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांना टोला लगावला आहे. त्याचसोबत धर्मवीर चित्रपटात दाखवलेल्या राजन विचारेंबद्दल भाष्य केलं आहे.
साखर पट्ट्यात दिगजांची प्रतिष्ठा पणाला
मुख्यमंत्री म्हणाले,” धर्मवीर चित्रपटात दाखवलेले राजन विचारे खोटे आहेत. त्यांच्या खऱ्या भूमिकेविषयी आम्ही दुसऱ्या भागात दाखवणार आहोत. दिघे साहेबांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं होता परंतु त्यांनी दिला नाही. ते रघुनाथ मोरे साहेबांकडे गेले, त्यावर ,मोरे साहेबांनी त्यांना समजावले. पण त्यावेळी ते दिघे साहेबांना काहीही बोले.” असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
“राजन विचारे हे दिघे साहेबांचे नकली शिष्य आहेत, खरे शिष्य तर नरेश म्हस्के आहेत”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विचारेंना डिवचले आहे. पुढे शिंदेनी राज ठाकरे यांच्याबाबत देखील भाष्य केले. एकनाथ शिंदे म्हणाले, “आनंद दिघेंनी नेते पदासाठी राज ठाकरे यांचे नाव पुढे केले होते. राज ठाकरेंनी खूप मेहनत घेतली असून त्यांच्या नावाचा विचार करावा,” असं दिघे साहेब म्हणाले होते. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला होता.