26.6 C
New York

Eknath Shinde: मुलगा जखमी झाल्याचे समजताच मुख्यमंत्री स्वतः मुलाला घेऊन रुग्णालयात

Published:

ठाण्यातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचार रॅलीचे काल (रविवारी) किसन नगर परिसरात आयोजन करण्यात आले होते. ही रॅली सुरू असताना घडलेल्या एका घटनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde)यांच्या संवेदनशीलतेचा वेगळा अनुभव ठाणेकरांना पाहायला मिळाला. एक लहान मुलगा जखमी झाल्याचे समजताच मुख्यमंत्री स्वतः मुलाला घेऊन रुग्णालयात पोहोचले. जखमी मुलाचे नाव ऐकून देखील शिंदे थोडेसे भावूक झाल्याचे दिसले.

पैसा… नुसता पैसा… झारखंडमध्ये मंत्र्याच्या नोकराकडे सापडले मोठे घबाड

शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली किसन नगर परिसरात पोहोचली, मात्र रॅली सुरू असताना अचानक मुख्यमंत्र्यांना एक आई आपल्या जखमी मुलाला रस्त्याने नेताना दिसली. या आईच्या खांद्यावर एक मूल आणि हातात दुसरे मूल होते. मुलाचा हात चांगलाच भाजला असल्याने ती त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी तिला पाहिले आणि अडचण जाणून घेतल्यानंतर ते रॅली सोडून तिच्या मदतीला धावले.

… त्या मुलाचे नावदेखील रुद्रांश

त्यांनी तात्काळ मुलाला सोबत घेऊन जवळच्या रुग्णालयात नेले. त्यांनी तेथे जाऊन डॉक्टरांना जखमी हातावर तातडीने उपचार करण्यास सांगितले. रुद्रांश रोनित चौधरी असे या नऊ वर्षांच्या मुलाचे नाव असून, घरात खेळत असताना हातावर तेल पडल्याने त्याचा हात गंभीररित्या भाजला. मुख्यमंत्र्यांनी त्यांना रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. तो सुखरूप असल्याची ग्वाही मिळाल्यानंतरच मुख्यमंत्री पुन्हा एकदा प्रचार रॅलीत सहभागी झाले. मात्र मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या या तत्परतेमुळे एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख पुन्हा एकदा ठाणेकरांसमोर ठळक झाली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img