22.3 C
New York

Bhushan Patil : पॅराशूट उमेदवारला डावलून जनता मला नक्कीच जिंकून देणार – भूषण पाटील

Published:

रमेश औताडे, मुंबई

गेल्या 32 वर्षापासून जनतेच्या दारात जाऊन त्यांची सेवा करत असल्याने आयात केलेले पॅराशूट उमेदवार केंद्रीय कॅबिनेट मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांना पराभूत करण्यासाठी वरिष्ठांनी माझी उमेदवारी जाहीर केली असून जनता मला नक्कीच जिंकून देणार आहे. असा विश्वास उत्तर मुंबई लोकसभेचे (North Mumbai Loksabha) उमेदवार भूषण पाटील (Bhushan Patil) यांनी व्यक्त केला.

यावेळी भूषण पाटील म्हणाले, गोराई मनोरी येथे एक गाव आहे त्या ठिकाणी रुग्णालय नाही, रस्ते नाहीत,टँकर ने पाणीपुरवठा होत आहे. अशी स्थिती भाजपाने करून ठेवली असल्याने जनता त्रस्त होऊन भाजपला शिव्या देत आहे. त्यामुळे आता भाजपला मतदान होणार नाही असे पाटील म्हणाले.

मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेला आयोजित केलेला ” उत्सव लोकशाहीचा २०२४ ” या वार्तालाप मालिकेत सोमवारी भूषण पाटील बोलत होते. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर उपस्थित होते.

यावेळी भूषण पाटील म्हणाले ,भाजप सरकाने गेल्या दहा वर्षात आश्वासननापलीकडे काहीच केले नाही. वाहतूक प्रश्न, फेरीवाल्यांच्या समस्या, पर्यावरण, शिक्षण, बेरोजगारी ,महागाई, रस्ते या व इतर समस्या वाढल्या असताना याबाबत भाजपाने काहीही केले नाही.असा आरोप पाटील यांनी यांनी यावेळी केला.

“विरोधकांची समस्या झाली जटील..कारण समोर आहे भूषण पाटील” असे बोलत पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यावेळी म्हणाले, भूषण पाटील हे स्थानिक असल्याने यांना जनतेचा पाठींबा असल्याचे चित्र आहे. तर कार्यवाह संदीप चव्हाण म्हणाले, या मतदार संघाचा इतिहास पाहता भूषण पाटील जॉईंट किलर होतील.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मतदार संघात आपणास कोणते आव्हान वाटत आहे. या स्वाती घोसाळकर यांच्या थेट प्रश्नावर पाटील म्हणाले, पियूष गोयल हे पॅराशूट उमेदवार आहे. गोपाळ शेट्टी जर स्पर्धक असते तरी काही फरक पडला नसता. कारण जनता भाजपला त्रासली आहे. मतदार चिडले आहेत.असे पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img