23.1 C
New York

Bernard Hill: ‘टायटॅनिक’चा कॅप्टन हरपला; ७९ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड

Published:

१९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टायटॅनिक’ (Titanic) चित्रपटात कॅप्टनचे पात्र साकारलेल्या अभिनेते बर्नाड हिल (Bernard Hill) यांचं निधन. ७९ व्या वर्षी ह्या हॉलिवूड अभिनेत्याचे निधन झाले. बर्नार्ड हिल यांच्या निधनामुळे हॉलिवूड(Hollywood) सिनेसृष्टीत धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. बर्नार्ड हिलची सहअभिनेत्री बार्बरा डिक्सन यांनी अभिनेत्याच्या निधनाचे वृत्त दिले आहे.

‘टायटॅनिक’ आणि ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ सारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट बर्नाड हिल यांनी आपल्या सिनेकारकिर्दित केले आहेत. अभिनेत्री बार्बरा डिक्सन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ पोस्ट शेअर केलेली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं की, “बर्नार्ड हिल यांच्या निधनाचे वृत्त मी अतिशय जड अंत:करणाने सांगत आहे. १९७४ मध्ये विली रसेलच्या ‘जॉन पॉल जॉर्ज रिंगो अँड बर्ट’ या शोमध्ये आम्ही दोघांनीही एकत्रित काम केले होते. तो एक अप्रतिम अभिनेता होता. त्यांच्यासोबत काम करणे ही बाब माझ्यासाठी खास होती. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.”

‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ होणार ऑफ एअर! तर घडलं असं…

नेमके कोणत्या कारणांमुळे बर्नार्ड हिल यांचे निधन झाले आहे हे अद्याप समजले नाही. परंतु, मीडिया रिपोर्टनुसार, रविवारी (५ मे) रोजी सकाळी अभिनेत्याचे मॅनेजर लू कोल्सन यांनी निधनाची माहिती दिली. ‘टायटॅनिक’ चित्रपटामध्ये बर्नार्ड हिल यांनी भूमिका साकारली होती. त्यांनी ‘कॅप्टन एडवर्ड स्मिथ’ची आयकॉनिक भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक फक्त हॉलिवूड सिनेसृष्टीतच नाही तर जगभरामध्ये त्यांचे कौतुक झाले होते. त्यांनी फक्त चित्रपटात नाही तर टीव्ही शो आणि थिएटरमध्येही काम केले आहे. याशिवाय ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ चित्रपटातूनही त्यांना अनोखी ओळख मिळाली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img