7.3 C
New York

Ananya Panday: अनन्या आणि आदित्य यांच ब्रेकअप? नेमकं प्रकरण काय?

Published:

(Ananya Panday Aditya Roy Kapur Breakup) बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर गेले काही दिवस चर्चेत आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते दोघे डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघेही अनेकदा स्पेशल स्क्रिनिंगला असो किंवा एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करताना दिसतात. मात्र या जोडीच्या रिलेशनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता ब्रेकअपच्या चर्चा सुरु आहेत.

अनन्या आणि आदित्यचं ब्रेकअप झाल्याची माहिती एक महिन्यापूर्वीच दोघांच्या एका कॉमन फ्रेंडने दिलेली आहे. बॉम्बे टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, ‘आदित्य आणि अनन्याचा एक महिन्यापूर्वीच ब्रेकअप झाला आहे. त्यांचं एकमेकांसोबतचे नातं खूप चांगलं होतं. त्यांच्या ब्रेकअपची माहिती आम्हाला सर्वांसाठीच खूप धक्कादायक होती.’ असं तो म्हणाला आहे. त्यातच त्या दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. तेव्हापासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र दोन्ही अभिनेत्यांनी याबाबत भाष्य केलं नाही.

गुरुचरण सिंगच्या वडिलांची प्रतिक्रिया; केला मोठा खुलासा…

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या रिलेशनच्या चर्चा वारंवार सुरु होत्या. परंतु याबाबत दोघांनीही रिलेशनबद्दल केव्हाही अधिकृतरित्या भाष्य केलेले नव्हते. पण असं असलं तरीही ते अनेकदा, स्क्रिनिंगवेळी किंवा पार्टीला एकत्र उपस्थित राहिले होते. ‘कॉफी विथ करण’च्या ७व्या सीझनपासून अनन्या आणि आदित्यच्या डेटिंगच्या चर्चांना सुरवात झाली होती. शो दरम्यान अनन्या पांडे तिच्या नात्याबद्दल बोलली होती, तेव्हा करण जोहरने आदित्यसोबतच्या तिच्या नात्याबद्दल संकेत दिले होते. ‘कॉफी विथ करण’च्या ८व्या सीझनमध्येही करणने अनन्याला प्रश्न विचारला होता की, तू आदित्य रॉय कपूरला डेट करते आहेस का? यावर तिनं “यावर काहीच बोलायचं नाही.” असं उत्तर दिलं असून याबाबत बोलायचं टाळलं होत. त्यामुळे दोघांच्या नात्यासंदर्भात चर्चांना उधाण आले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img