19.7 C
New York

Firing in Jammu Kashmir : पुंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला

Published:

जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात शाहसीतारजवळ भारतीय हवाई दलाच्या (Firing in Jammu Kashmir) वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी वाहनांवर जोरदार गोळीबार केला. त्यानंतर आता स्थानिक लष्करी तुकड्यांकडून परिसरात सध्या घेराव आणि शोधमोहीम सुरू आहे. ताफा सुरक्षित करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या हल्ल्यात 5 जवान जखमी झाले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान हवाई दलाचा एक जवान हुतात्मा झाला. तर दुसऱ्या जवानाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तर तीन जवानांची प्रकृती स्थिर आहे.

यामध्ये पाच IAF जवानांना गोळ्या लागल्या आणि त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी जवळच्या लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले. तर एक जवान शहिद झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, भारतीय लष्कर आणि पोलिसांचा अतिरिक्त ताफा घटनास्थळी पाठवण्यात आला आहे. राष्ट्रीय रायफल्स युनिटच्या स्थानिक तुकडीने परिसराची नाकेबंदी करून शोध मोहीम सुरू केली आहे. त्याचवेळी हवाई दलाची वाहने शाहसीतारजवळील एअरबेसच्या आत सुरक्षितपणे पोहोचवण्यात आली आहेत.घटनास्थळी भारतीय हवाई दलाचे गरुड विशेष दलही तैनात करण्यात आले आहे. या घटनेत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांविरोधात लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे जवान शोध मोहिमेत गुंतले आहेत.

राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचं प्रतिउत्तर

हवाई तळाबाहेर शाहसीतारजवळील जनरल परिसरात हा हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी वाहनांवर गोळीबार केला. दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. गेल्या महिन्यात पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला केला होता, ज्यात अनेक जवान शहीद झाले होते. यामध्ये हवाई दलाच्या वाहनावर गोळ्यांच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत.

Firing in Jammu Kashmir काय म्हणाले लष्कर?

सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितले की, “दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला केला आहे. स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराची घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली आहे. शाहसीतारजवळील जनरल परिसरात हवाई तळाच्या आत वाहने सुरक्षित करण्यात आली आहेत. या हल्ल्यात लष्करी जवान जखमी झाले असून अद्याप कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img