21 C
New York

Mumbai Police : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, बनावट नोटांच्या कारखान्यावर धाड

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) नाकाबंदी आणि पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून बनावट नोटा (Cash) छापणाऱ्या तोडीला अटक केली आहे. मुंबईतील बीकेसी (BKC) येथे नोटा छापणाऱ्या कारखान्यावर पोलिसांकडून धाड टाकण्यात आली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील बांद्रा कुर्ला संकुल येथील भारत नगर परिसरात बनावट नोटा तयार करणाऱ्या एक कारखान्यावर शनिवारी रात्री पोलिसांनी धाड टाकली असून यातून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त करण्यात आले आहे. या कारखान्यामधून 5,10, 20, 100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यात येत होत्या. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून आरोपी नौशाद शाह, अली सय्यद या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना पाच दिवसाची पुलिस कोठडी मिळाली आहे.

मुंबईमध्ये लोकसभा निवडणूक 20 मे रोजी पार पडणार आहे. त्यामुळे सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीचे तयारी सुरू झाली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रचार सभा आणि रॅली निघत आहे. याचाच फायदा घेत बनावट नोटा प्रसारवण्याचा प्रयत्न आरोपींचा आहे का याचा शोध सध्या मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. तसेच या नोटा कुणाला वितरित करण्यात आल्या याचा शोध मुंबई पोलीस घेत आहे. यापूर्वी देखील मुंबई पोलिसांनी नाका बंदी करताना मुंबईत कोट्यावधी रुपयाची रोकड जप्त केली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img