या वयात जो कुटुंब सांभाळू शकत नाही, तो महाराष्ट्र काय सांभाळणार, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी पवारांवर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना पवार (Sharad Pawar) म्हणाले की, मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं आहे? मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक असून, मीदेखील त्यांच्या कुटुंबावर बोलू शकतो, पण मी मोदींच्या पातळीला जाणार नाही. ते जळगावमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकारांशी बोलतांना शरद पवार म्हणाले, मला सुद्धा मोदींबद्दल माहिती आहे. त्यांनीही कुठे कुटुंब सांभाळले आहे ? मी त्यांच्या सारखा खालच्या स्थरावर जाऊ इच्छित नाही. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. पण, असे व्यक्तिगत बोलणे योग्य नाही.
Sharad Pawar मोदींच्या रिझल्टबद्दल माहिती नाही…
उद्धव ठाकरे यांच्यावर संकट आल्यास त्यांना मदत करणारा पहिला व्यक्ती मी असेल असे विधान प्रतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केले होते. त्यांच्या या विधानावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदीसाहेब रिझल्ट देतात की माहिती नाही. पण त्यावर चर्चा, भाष्य आणि टीकाटिप्पणी करण्यात वेळ जातो. ही गोष्ट लोकांच्या लक्षात आली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते शांतपणे आणि गाजावाजा न करता काम करायचे आणि रिझल्ट द्यायचे असे पवार यावेळी म्हणाले. मोदींच्या रिझल्टबद्दल माहिती नाही, पण त्यांचा चर्चा, भाष्य, टिका टिप्पणी यामध्ये फारवेळ जातो. लोकांच्या लक्षात येतय हे काही खरं नाही” असं शरद पवार म्हणाले.
समाजवादीच्या ‘या’ नेत्याची भरसभेत फजिती
शरद पवार म्हणाले, “मोदींनी लाख काहीही म्हटले असले तरी आमची प्रार्थना असेल की, उद्धव ठाकरेवर मोदी यांची मदत घेण्याची वेळ येऊ नये.” पवार म्हणाले, भाजपने मोठी घोषणा दिली आहे. ‘अब की बार ४०० पार’ त्यांना करायचे आहे. मात्र, हे करतांना भाजपाची मोठी दमछाक होत आहे. त्यांचा ४०० पार आकडा भाजपाने हा खाली आणला आहे. निवडणुकीच्या निकालात हे सर्व स्पष्ट होणार आहे.
Sharad Pawar ठाकरेंसाठी प्रार्थना..
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शस्त्रक्रियेच्या काळात आपण त्यांची विचारपूस केली. मोदी या सगळ्याबद्दल लाख बोलतील असे पवार म्हणाले. पण आमची प्रार्थना आहे की, उद्धव ठाकरे यांना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये असे म्हणत पवारांनी थेट पत्रकार परिषदेतच ठाकरेंसाठी साकडं घातलं आहे. लोकांमध्ये मोदींबद्दल असणारी आस्था सध्या कमी होताना दिसत आहे. त्यांचा स्वभाव बेछुटपणे बोलण्याचा आहे. मग ती गोष्ट झेपेल की नाही, सरकारची आर्थिक स्थिती काय आहे? याबद्दल यत्किचिंतही विचार न करता ते अनेक गोष्टी कबूल करतात. मोदींनी 2014 मध्ये जनतेसमोर अनेक गोष्टी मांडल्या.