21 C
New York

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं अमित शहांना प्रतिआव्हान

Published:

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज महायुतीचे (Mahayuti) उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आव्हान देत तुम्ही राम मंदिर, सीएएवर बोलूवून दाखवा असा आव्हान दिला होता तर आता उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कणकवलीत जाहीर सभा घेत अमित शहा तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही जनतेच्या प्रश्नांवर बोला असा प्रतिआव्हान केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शहा यांनी रत्नागिरीमध्ये शिवसेनेला नकली शिवसेना म्हणत मला एक आव्हान देऊन गेले की, तुमच्यात हिम्मत असेल तर याच्यावर बोला त्याच्यावर बोला पण जर तुमच्यात हिम्मत असेल तर अमित शहा तुम्ही जनतेच्या प्रश्नांवर बोला असं प्रतिउत्तर उद्धव यांनी दिले आहे.

Uddhav Thackeray राम मंदिरसाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, राम मंदिर बांधलं हे चांगलंच केलं. पण तुमची हिंमत नव्हती, तेव्हा शिवसेना पुढे होती. तुम्ही गेल्या 10 वर्षापासून सत्तेत आहे तरीही तुम्ही काय करू शकले नाही. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना टोला लावला. अमित शाह तुम्ही माझ्या वडिलांचं नाव घेऊन मत मागू नका तुम्ही आमचे माणसे फोडले, तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव पुढे ठेवून मत मागा असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. राम मंदिरसाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला. मी राम मंदिरात जाऊन आलो मात्र तुम्ही भवानी मंदिरात का गेले नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

…त्याचवेळी मी बंड करायला हवं होतं- अजित पवार

Uddhav Thackeray लाज नाही लज्जा नाही फक्त बडबडतो – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले तुमच्यात हिम्मत असेल उद्या कोंकणात येऊन घोषणा करा बारसुला रिफायनरी होणार नाही असं आव्हान देखील उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना दिला. तर रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. ठाकरे म्हणाले, आज सकाळी मला कोणी तरी धमकी दिली की कोण इथं येतो बघतो, मी येऊन उभा आहे, तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो अशा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना दिला. तुला लाज वाटली पाहिजे यापूर्वी देखील इकडे येऊन तुला आडवा केला त्यानंतर माझ्या घराकडे तुला साफ केला, लाज नाही लज्जा नाही फक्त बडबडतो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर टीका केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img