11.6 C
New York

Kapil Sharma: ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ होणार ऑफ एअर! तर घडलं असं…

Published:

(Kapil Sharma) काही दिवसांपासून सुरु असणारा शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ (The Great Indian Kapil Sharma Show) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. मात्र फक्त ५ एपिसोड रिलीझ झाले आणि आता हा शो प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या अगोदर टीव्हीवर बरेच वर्षे टेलिकास्ट झालेल्या ह्या शोने ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचे हवे तसे मनोरंजन केले नाही. निर्मात्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून शोच्या सेटची निर्मिती केली होती. परंतु, केवळ ५ एपिसोड टेलिकास्ट होऊन हा शो आता ऑफ एअर होणार आहे.

नुकताच ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ चा पहिला सिझन पार पडला. शेवटचा एपिसोड संपल्यानंतर शोमधील कलाकारांनी व्रॅपअप पार्टीचे आयोजन केले होते. सोशल मीडियावर या पार्टीचे काही फोटोज झळकत आहेत. नेटफ्लिक्सवर ३० मार्चपासून सुरु झालेल्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ ने प्रेक्षकांची मने जिंकली. नुकतंच या शोच्या शेवटच्या एपिसोडची शुटिंग संपली. शनिवार (४ मे ) रोजी नेटफ्लिक्सवर या शोचा सहावा एपिसोड स्ट्रीम झाला आहे. यावेळी शोमध्ये सनी देओल आणि बॉबी देओलने हजेरी लावली होती.

अनुज थापरचा शवविच्छेदन अहवाल समोर!http://अनुज थापरचा शवविच्छेदन अहवाल समोर!

किकू शारदाने नुकताच मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ” ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’च्या पहिल्या सीझनमध्ये एकूण १३ एपिसोड्स आहेत. त्यातील सर्वांचीच शुटिंग नुकतीच संपलेली आहे. लवकरच आम्ही दुसरा सीझनही घेऊन तुमच्या भेटीला येतोय. आम्ही दुसऱ्या सीझनबद्दलही नियोजन आधीच केलेले आहे. दुसऱ्या सीझनला जास्त वेळ लागणार नाही.” काही रिपोर्टनुसार, कपिल शर्मा या शोमध्ये एका एपिसोडचे ५ कोटी रुपये मानधन घेत असल्याची चर्चा आहे. तर अर्चना पूरण सिंगला फक्त सोफ्यावर बसून हसण्यासाठी एका एपिसोडसाठी १० लाख रुपये मानधन दिले जाते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img