21 C
New York

Salman Khan : अनुज थापरचा शवविच्छेदन अहवाल समोर!

Published:

सलमान खान (Salman Khan) गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. त्यातील दोन्ही आरोपींना शस्त्रे पुरवणारा अनुज थापरने मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील लॉकअपमध्ये बुधवारी (१ मे) आत्महत्या केली आहे. आरोपी अनुज थापर (Anuj Thapar) हा मूळचा पंजाबचा असून त्याने शौचालयातील खिडकीला चादरीच्या पट्टीच्या सहाय्याने गळफास घेतला. नुकत्याच आलेल्या त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार अनुजने तुरूंगात गळफास लावून घेतल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : अभिजीत बिचुकले भरणार कल्याण लोकसभा मतदारसंघातून अर्ज

Salman Khan : अनुज थापरच्या मानेवर जखम

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या मानेवर काही जखमेच्या खुणा होत्या. त्याचसोबत गुदमरल्याच्या खुणा होत्या. अनुजच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस कोठडीत छळ करून अनुजची हत्या करण्यात आली, असा आरोप केला आहे. याबाबत सीबीआय चौकशीची मागणी अनुजच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे. अनुज थापर आणि त्याचा सहकारी सोनू बिष्णोईला २६ एप्रिल रोजी पंजाबमधून अटक करण्यात आली होती. त्या दोघांवर सलमान खान गोळीबार प्रकरणी हल्लेखोरांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप होता.

अनुज थापरचा मृतदेह क्रॉफर्ड मार्केटमधील क्राईम ब्रँच लॉकअपमध्ये बुधवारी (१ मे) आढळून आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने लॉकअपच्या शौचालयातील खिडकीला चादरीच्या पट्टीच्या सहाय्याने गळफास घेतला. गुरुवारी (२ मे ) रोजी सांयकाळी भायखळ्यातील जे.जे. रुग्णालयात आरोपी अनुज थापनचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचे शवविच्छेदन प्राथमिक अहवालामध्ये स्पष्ट झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारती सिंग रुग्णालयात दाखल! तिला अश्रू झाले अनावर

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img