दिल्लीत वडा पाव विकणाऱ्या महिलेला ताब्यात घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सध्या ‘वडापाव गर्ल’ (Vada Pav Girl) ही सोशल मीडियावर चर्चेत आहे. वडापाव गर्लचं खरं नाव चंद्रिका गेरा दीक्षित, असं आहे. आता या व्हिडीओबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की वडापाव विक्रेत्याला अटक करण्यात आलेली नाही किंवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. वास्तविक या महिलेचे सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत.
Vada Pav Girl पोलिसांनी सांगितलं सत्य
चंद्रिका गेरा दीक्षित उर्फ ‘वडापाव गर्ल’ गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली येथील मंगोलपुरी भागात वडापावचा स्टॉल लावत आहे. तिच्या या स्टॉलचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यातच सोशल मीडियावर आणखी एका तिचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये काही महिला पोलीस अधिकारी हे वडापाव गर्लला घेऊन जाताना दिसले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली की, वडापाव गर्लला अटक झाली आहे. आता पोलिसांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की, वडापाव गर्लला अटक झालेली नाही, तसेच तिच्याविरोधात गुन्हा देखील दाखल झालेला नाही.
Vada Pav Girl ना अटक झाली, ना केस..
काही दिवसांपूर्वी, वडापाव गर्लनं रस्त्यावर MCD च्या परवानगीशिवाय एका भंडाऱ्याचे आयोजन केले होते. ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली लोकांची गैरसोय झाली. याबाबत तक्रार आल्यानंतर अधिकाऱ्यांनी तिला पोलीस ठाण्यात नेले होते, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. डीसीपी आऊटरच्या म्हणण्यानुसार, या वडापाव गर्लला अटक करण्यात आली नाही किंवा तिच्या विरोधात कोणाताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. एमसीडीने तिला फक्त चलन जारी केले होते.