21 C
New York

Naresh Goyal : नरेश गोयल यांना जमीन मिळणार का ?

Published:

मनी लाँड्रिंग प्रकरणात जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल (Naresh Goyal) यांच्या अंतरिम वैद्यकीय जामिनावर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. शुक्रवारी (३ मे) झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांच्या एकल खंडपीठाने ६ मे रोजी आदेश दिला जाईल, असे सांगितले. त्याच वेळी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात गोयल यांनी वैद्यकीय कारणास्तव मागितलेल्या जामीनाला विरोध केला. तसेच खाजगी रुग्णालयात त्यांचा मुक्काम महिनाभर वाढवला जाऊ शकतो असं सांगितलं जात आहे.

Naresh Goyal जामीन मागताना नरेश गोयल यांचे वकील हरीश साळवे म्हणाले

गोयल यांनी गेल्या आठवड्यात वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मिळावी अशी मागणी केली होती. याच कारण त्यांची पत्नी अनिता गोयल कर्करोगाने ग्रस्त आहेत. याआधी फेब्रुवारीमध्ये विशेष न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला होता, परंतु उपचारासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर गोयल यांनी आता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. जामीन मागताना नरेश गोयल यांचे वकील हरीश साळवे म्हणाले की, गोयल यांच्यावरील आरोप गंभीर आहेत, मात्र त्यांच्या पत्नीला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रासले असून त्यांच्याकडे काही महिनेच शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत गोयल यांना त्यांच्या पत्नीच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी दिली पाहिजे. अशी मागणी केली.

गोयल यांना कॅनरा बँक फसवणुकीप्रकरणी अटक करण्यात आली होती. कथित बँक फसवणुकीप्रकरणी ईडीने नरेश गोयल यांना गेल्या वर्षी १ सप्टेंबर रोजी अटक केली. तसेच या प्रकरणी नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांना देखील गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती, मात्र त्यांचे वय आणि प्रकृती लक्षात घेऊन त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु आता ६ मे रोजी सुनावणीत नरेश गोयल यांना मुंबई उच्च न्यायालय जमीन देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img