4.6 C
New York

Mumbai High Tide : मुंबईला पुढील 36 तास हायटाईडचा अलर्ट

Published:

मुंबईला वेढणाऱ्या समुद्रात आगामी ३६ तासांच्या कालावधीत भरतीच्या वेळी अंदाजे ५ मीटर पेक्षाही (Mumbai High Tide) जास्त उंचीच्या मोठ्या लाटा उसळणार आहेत. परिणामी, येत्या ३६ तासाच्या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे. तसेच मच्छिमार बांधवांनी योग्य दक्षता घ्यावी. त्यामुळे जीविताला धोका उद्भवू शकतो, असा इशारा मुंबई महापालिकेने ‘ भारतीय हवामानशास्र विभाग’ (IMD) आणि ‘इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीस’ यांच्या हवाल्याने मुंबईकरांना दिला आहे. मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. पालिकेने आपली आपत्कालिन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. अग्निशमन दल, नौदल, पोलीस यांनाही अलर्ट करण्यात आले असल्याचे समजते.

कांद्याचे दर नियंत्रीत ठेवण्यासाठी निर्यात शुल्क लागू

Mumbai High Tide समुद्रात ३६ तासांत भरती व ओहोटीची माहिती

४ मे

  • समुद्रात भरती -: सकाळी ८.५३ वाजता ३.५८ मीटर उंच लाटा उसळणार
  • ओहोटी -: दुपारी २.३६ वाजता, लाटांची उंची १.४० मीटर
  • समुद्रात भरती -: रात्री ९.०९ वाजता ४.०८ मीटर उंच लाटा उसळणार

५ मे

  • ओहोटी -: मध्यरात्री ३.३० वाजता, लाटांची उंची १.०५ मीटर
  • समुद्रात भरती -: सकाळी ९.५० वाजता ४.०४ मीटर उंच लाटा उसळणार
  • ओहोटी -: दुपारी ३.३५ वाजता, लाटांची उंची १.३२ मीटर
  • समुद्रात भरती -: रात्री ९.५६ वाजता ४.२४ मीटर उंच लाटा उसळणार

परिणामी, येत्या ३६ तासांत नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे. तसेच मच्छिमार बांधवांनी योग्य दक्षता घ्यावी. सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. समुद्रात नेहमीपेक्षा ०.०५ ते १.५ मीटर अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा लक्षात घेता, मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी महापालिकेच्या सर्व सहायक आयुक्त यांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याचे आणि यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या संपूर्ण परिस्थितीवर बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस तसेच इतर यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. पर्यटक व किनारपट्टीवर वास्तव्यास असलेल्या सर्व नागरिकांनी या कालावधीत घाबरून न जाता दक्ष राहावे, समुद्रात शिरू नये. तसेच समुद्र किनारी तैनात असलेले महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक, जीवरक्षक तसेच अधिकारी, कर्मचारी आणि सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.

Mumbai High Tide ३६ तास डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याचे आव्हान

या ३६ तासांच्या कालावधीत समुद्रातील हालचालींवर, घडणाऱ्या घडामोडींवर, संपूर्ण परिस्थितीवर मुंबई महापालिका, मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस तसेच इतर यंत्रणा लक्ष ठेवून असणार आहेत. पर्यटक व किनारपट्टीवर वास्तव्यास असलेल्या सर्व नागरिकांनी या कालावधीत घाबरून न जाता दक्ष राहावे, समुद्रात जावू नये. तसेच समुद्र किनारी तैनात असलेले महापालिकेचे सुरक्षा रक्षक, जीवरक्षक तसेच अधिकारी, कर्मचारी आणि सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

नरेश गोयल यांना जमीन मिळणार का ?

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img