19.7 C
New York

Kalyan Lok sabha : छाननीत 4 उमेदवारी अर्ज अवैध

Published:

डोंबिवली ( शंकर जाधव )

कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी (Kalyan Lok sabha) दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत 4 उमेदवार वैध ठरले आहेत.शनिवार 4 मे रोजी सकाळी वाजता पार पडलेल्या छाननी प्रकिया पार पडली. त्यामुळे निवडणुकीत 30 उमेदवार वैध ठरले असल्याची माहिती कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे.

…जो कुटुंब सांभाळू शकत नाही, पवारांचा मोदींवर निशाणा

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदती अखेर कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 34 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. सर्व नामनिर्देशन अर्जाची शनिवारी छाननी करण्यात आली होती. यावेळी निवडणूक आयोगाचे -कल्याण लोकसभेचे सर्वसामान्य निरीक्षक मनोज जैन (आयएएस) हे उपस्थित होते. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सर्व अर्जांची 24-कल्याण लोकसभा मतदार संघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी छाननी केली.छाननीत कल्याण लोकसभा मतदारसंघात अवैध ठरलेले उमेदवार हबीबुर रेहमान ओबेदुररहेमान खान – (अपक्ष ),जमिला इरफान शेख ( अपक्ष ),काशिनाथ विठ्ठल नारायणकर (अपक्ष ) व अश्फाक अली सिध्दीकी ( अपक्ष ) अशी नावे आहेत.अर्ज केलेल्या उमेदवारांना सोमवार 6 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याचे कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img