4.6 C
New York

Host America : टी- २० विश्वचषकासाठी यजमानांचा संघ जाहीर

Published:

अमेरिकेत होणाऱ्या क्रिकेटच्या ट्वेंटी-२० विश्वचषक (T-20 World cup) स्पर्धेसाठी यजमान अमेरिकेने (Host America) आपला १५ सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. अमेरिकेने मोनांक पटेल (Monank Patel) यांच्याकडे संघाचे नेतृत्व दिले आहे. भारताच्या अंडर १९ विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार आणि आता अमेरिकेत स्थायिक झालेला उन्मुक्त चंद (Unmukt Chand) याला संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. न्यूझीलंडकडून विश्वचषकाचा अंतिम सामना खेळलेला कोरी अँडरसन (Corey Anderson) याला अमेरिकेच्या संघात संधी मिळाली आहे. २०१५ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या एकदिवशीय क्रिकेट वर्ल्ड कप फायनलच्या सामन्यात कोरी अँडरसन न्यूझीलंडकडून खेळला होता.

हेही वाचा : दहावी, बारावीचा निकाल ‘या’ तारखेनंतर

अमेरिकेच्या संघात दिग्ग्ज टीम्सशी मुकाबला करणारे खेळाडू नाहीत. मात्र, कोरी अँडरसन याच्या सहभागाने अमेरिकेच्या संघाला बळ मिळाले आहे. त्याच्या उपस्थितीत अमेरिकेने अलीकडेच कॅनडाचा पराभव केला होता. पण, या संघात भारताच्या अंडर-१९ विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद याचा समावेश या संघात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भारताच्या अंडर-१९ संघातील एकेकाळचा स्टार गोलंदाज सौरभ नेत्रावलकरला मात्र अमेरिकेच्या संघात स्थान मिळाले आहे. या संघात भारतीय वंशाचे सात खेळाडू आहेत.

Host America : विश्वचषकासाठी निवडलेला अमेरिकेचा संघ

मोनांक पटेल (कर्णधार), कोरी अँडरसन, एरोन जोन्स, एंड्रीज गौस, अली खान, हरमीत सिंह, जेसी सिंह, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोशतुश केनजिगे, सौरभ नेत्रावलकर, शॅडली वान शल्कविक, स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर.
राखीव खेळाडू – गजानंद सिंह, जुआनॉय ड्रायस्डेल, यासिर मोहम्मद.

Host America : असे आहेत चार गट

अ – भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क – न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड – दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img