8.4 C
New York

Hamida Banu: आजच्या गुगल डुडलची ही आहे कहाणी…

Published:

शनिवार (४ मे) रोजी भारतीय कुस्तीपट्टू हमीदा बानू (Hamida Banu) यांच्या स्मरणार्थ गुगलने एक डूडल जारी केले. हमीदा बानू यांना भारतातील पहिली व्यावसायिक महिला कुस्तीपटू मानले जाते. त्यांना मानवंदना देण्यासाठी गुगल डूडलच्या वर्णनात असे म्हटले आहे की, “हमिदा बानू त्यांच्या काळातील ट्रेलब्लेझर होत्या, आणि त्यांची निर्भयता संपूर्ण भारत आणि जगभरात लक्षात ठेवली जाते.” १९५४ मध्ये झालेल्या कुस्ती सामन्यात हमीद बानूने अवघ्या १ मिनिट ३४ सेकंदात विजय मिळवला. त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता देखील मिळाली. त्यांनी प्रसिद्ध कुस्तीपटू बाबा पेहलवान यांचा पराभव केला.

उद्धव ठाकरेंचं अमित शहांना प्रतिआव्हानhttp://उद्धव ठाकरेंचं अमित शहांना प्रतिआव्हान


गुगल भारतातील पहिली व्यावसायिक महिला कुस्तीपटू हमिदा बानू यांची जयंती साजरी करत आहे. हे डुडल बंगळुरू येथील कलाकार दिव्या नेगी यांनी चित्रित केले आहे. १९४० आणि १९५० च्या दशकात खेळांमध्ये पुरुषांचे वर्चस्व होते त्या काळात हमीदा बानू यांनी नाव कमवले. हे डुडल भारतीय कुस्तीपटू हमीदा बानूचे औचित्य दर्शवते.


कोण आहेत हमीदा बानू?
हमीदा बानू यांना भारतातील पहिली महिला कुस्तीपटू मानले जाते. त्यांचा जन्म 1900 च्या दशकाच्या सुरुवातीस अलिगढ, उत्तर प्रदेशजवळ झाला. 1940 आणि 1950 च्या कारकिर्दीत सुश्री बानू यांनी 300 हून अधिक स्पर्धा जिंकल्या. सुश्री बानूचा सन्मान करण्यासाठी 4 मे ही तारीख निवडण्यात आली कारण याच दिवशी 1954 मध्ये त्यांनी प्रसिद्ध कुस्तीपटू बाबा पहेलवान यांना आव्हान दिले आणि पराभूत केले. त्यानंतर व्यावसायिक कुस्तीतून निवृत्ती घेतली. “1954 मध्ये या दिवशी, बानूला आंतरराष्ट्रीय मान्यता आणि प्रशंसा मिळवून देणाऱ्या कुस्ती सामन्याची नोंद झाली. त्यांनी प्रसिद्ध कुस्तीपटू बाबा पहलवानला केवळ 1 मिनिट आणि 34 सेकंदात पराभूत केले होते, त्यानंतर त्यांनी व्यावसायिक कुस्तीतून निवृत्ती घेतली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img