17.6 C
New York

Gangadhar Gade : दलित नेते, नामांतराचे प्रणेते गंगाधर गाडे यांचे निधन

Published:

जेष्ठ नेते माजी मंत्री गंगाधर गाडे (Gangadhar Gade) यांनी पहाटे अखेरचा श्वास घेतला उत्तम राजकीय नेता गेल्याची भावना नेत्यांनी व्यक्त करत त्यांना ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली आहे. मराठवाड्यातील जेष्ठ नेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं प्रदीर्घ आजारामुळे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी वयाच्या 76 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गंगाधर गाडे राजकारणात 70 च्या दशकात आले. त्यांनी दलित अत्याचार स्कॉलरशिप गायरान हक्कांसाठी ते लढले. विशेषत : नामांतराच्या लढ्यात ते अग्रस्थानी होते. नामांतराच्या लढ्यात त्यांनी अनेकदा तुरुंगवास सुद्धा भोगला होता. काँग्रेसच्या कार्यकाळात ते राज्य परिवहनमंत्री होते. त्यांच्यावर उद्या सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्यांच्या शैक्षणिक संस्थेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

खलिस्तानी अतिरेकी निज्जरच्या हत्येप्रकरणी 3 भारतीयांना अटक

Gangadhar Gade गंगाधर गाडे यांनी नामांतर चळवळीतील अग्रणी नेते होते

रविवार 5 मे रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेतत्यांचं पार्थिव नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर नागसेन परिसरातचं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गंगाधर गाडे यांनी नामांतर चळवळीतील अग्रणी नेते होते. राज्यभरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. आंबेडकरी चळवळीतील अग्रणी नेते पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाधर गाडे यांनी आज सकाळी साडेचार वाजता अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. त्यानंतर शहर शोकसागरात बुडालं. गंगाधर गाडे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सूर्यकांता गाडे, मुलगा डॉ सिद्धांत गाडे, सून डॉ भावना वंजारी गाडे, बहिण निर्मला गवई, मेहुणे गुणवंत गवई, आणि नातवंडे असा आप्त परिवार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोळी गावात गाडे यांचा जन्म १९३९ मध्ये झाला. ते वकील होते आणि १९७२ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. ते माजी मुख्यमंत्री वसंतराव दप्ते यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. दलित हक्कांसाठी त्यांनी अनेक लढा दिला. ते मराठवाडा विद्यापीठाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे करण्यासाठी आंदोलनात सक्रिय होते.गाडेंच्या निधनाने महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img