23.1 C
New York

Amitabh Bachchan: उपमुख्यमंत्र्यांनी फिल्मी अंदाजात मानले अमिताभ बच्चन यांचे आभार!

Published:

बॉलीवूडचे बिग बी म्हणजेच अभिनेते सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते नेहेमीच नवनवीन माहिती चाहत्यांसोबत शेअर करतात. मात्र त्यांनी केलेल्या एका ट्विटची चांगलीच चर्चा होत आहे. गुरुवारी अमिताभ बच्चन यांनी कोस्टल रोडने प्रवास केला. या प्रवासाचा अनुभव त्यांनी ट्विट करत सांगितला.

अमिताभ बच्चन यांनी मॅरीने ड्राईव्ह ते जुहू पर्यंतचे अंतर अवघ्या ३० मिनिटात पूर्ण केल्याची माहिती दिली. तसेच त्यांनी ह्या ट्विटमध्ये त्यांचा प्रवास किती सुखकर आणि सोयीस्कर झाल्याची माहिती दिली. त्यावर व्यक्त होताना वाह ! क्या बात है ! साफ सुथरी, नयी बढिया सडक कोई रुकावट नही.. याबाबत त्यांनी ‘X’ वर पोस्ट केली. त्यांनी हा प्रवास करतानाची व्हिडिओ देखील पोस्ट केली होती.

मात्र त्यावरून राजकीय श्रेयवाद पेटला आहे. अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केलेल्या ट्वीटला भाजप (BJP) महाराष्ट्रकडून आज हमारे पास ‘कोस्टल रोड’ है…असे म्हणत अमिताभ यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळेच मुंबईकरांचा प्रवास वेगवान होत असल्याचा दावा केला भाजपने केले. त्यांना प्रतिउत्तर देत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी भाजपच्या दाव्याला डिवचले आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत कोस्टल रोडच्या निर्मितीपासून ते आतापर्यंतचा घटनाक्रम सांगितला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोस्टल रोडचं काम किती वेगाने सुरू होतं हे सांगताना भाजपचं यात काही योगदान नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी अधोरेखित केले.

त्याचसोबत आदित्य यांनी काही फोटोज पोस्ट करत कोस्टल रोडसाठी काय काय उपाययोजना, यंत्रणा उभी केली याची माहिती ‘X’वर पोस्ट केली.
मात्र या प्रकरणाला उधळ आलंय कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिल्मी अंदाजात अमिताभ बच्चन यांच्या ट्विटवर उत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी फिल्मीस्टाईलमध्ये अमिताभ यांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटलं की, “Parampara, Pratishtha, Anushasan, Ye iss sarkar ke teen stambh hai !” e wo aadarsh hain jinse hum Bharatiyon ka kal banaate hai”…, अमिताभ जी तुम्ही तुमच्या प्रवासाचा अनुभव शेअर केलात, त्याबद्दल खूप आभार. मुंबई आता अपग्रेड होतेय आणि आम्ही मुंबईकरांसाठी वेळ वाचवणाऱ्या प्रवासाचा अनुभव निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img