राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यभरात प्रचार सभांचा, रॅलींचा धडाका सुरू आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ देशभरात चर्चेत आहे. या मतदारसंघातील निवडणुकीत विजयाचा गुलाल कोण उधळणार, याचं उत्तर 4 जूनला मिळेलच. मात्र, त्याआधी प्रचार अन् राजकीय घडामोडींना वेग आला आहे. फोडाफोडीच्या राजकारणानेही वेग घेतला आहे. आताही शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. रोहित पवार यांचे कट्टर समर्थक आणि अहल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटात प्रवेश केला. याबाबत सविस्तर माहिती अशी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे लोकसभेच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे यांना पक्षात घेत थेट राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्षपदाची जबाबदारी अजितदादांनी दिली आहे.
बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार आहेत. या हायहोल्टेज लढतीकडे राज्याचं लक्ष आहे. शरद पवार आणि अजित पवार दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे दोन्ही नेते मैदानात उतरले आहेत. मतदारसंघात धनगर समाजाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी दोन्ही नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.
खलिस्तानी अतिरेकी निज्जरच्या हत्येप्रकरणी 3 भारतीयांना अटक
Ajit Pawar अजित पवार यांनीही अक्षय शिंदे यांना पक्षात प्रवेश दिला
याआधी शरद पवारांनी भूषणसिंहराजे होळकर यांना पक्षात प्रवेश दिला होता. त्यानंतर आता अजित पवार यांनीही अक्षय शिंदे यांना पक्षात प्रवेश दिला. अक्षय शिंदे हे मूळचे जामखेड तालुक्यातील चौंडी येथील आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून अक्षय शिंदे ओळखले जात होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्या विजयात अक्षय शिंदे यांचा मोठा वाटा होता. यानंतर अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेत राष्ट्रवादीतून बाहेर पडले. यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडीत अनेक नेत्यांनी अजित पवारांना साथ दिली. शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश केला. आमदार रोहित पवार यांच्याही समर्थकांनी अजित पवार गटात प्रवेश केला. मात्र अक्षय शिंदे रोहित पवारांबरोबर राहिले. आता मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत अजितदादांनी अक्षय शिंदे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला.
दलित नेते, नामांतराचे प्रणेते गंगाधर गाडे यांचे निधन
Ajit Pawar बारामतीत आज सभांचा धडाका..
दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव यांची दौंड तालुक्यातील वरवंड येथे आज दुपारी दोन वाजता जाहीर सभा होणार आहे. तर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यात चार सभा होणार आहेत.