17.6 C
New York

Nijjar Murder Case : खलिस्तानी अतिरेकी निज्जरच्या हत्येप्रकरणी 3 भारतीयांना अटक

Published:

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येशी (Nijjar Murder Case) संबंधित कॅनडाच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत तिघा संशयितांना शुक्रवारी अटक केली आहे. जून, 2023 मध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) याच्यावर कॅनडात गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणी शुक्रवारी तीन भारतीय नागरिकांना अटक केली. कॅनडातील माध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे. निज्जरच्या हत्येचा आरोप तिघांवर करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तिथे सादर केलेल्या कागदपत्रांमधून तिघेही भारतीय असल्याची माहिती समोर आलीय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांना अटक केली असून त्यांच्यावर आरोप आहे की ज्या दिवशी निज्जरची हत्या झाली तेव्हा तिघांनी शूटर, वाहन चालक म्हणून काम केलं. सीटीव्ही न्यूजने वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर निज्जरच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार अटक केलेल्या तिघांची नावे करणप्रीत सिंह, कमलप्रीत सिंह आणि करण बराड अशी आहेत. त्यांच्यावर निज्जरच्या हत्येचा कट रचल्याचा आरोपही आहे.

उद्धव ठाकरेंचं अमित शहांना प्रतिआव्हान

Nijjar Murder Case पुन्हा एकदा भारतावर लावले आरोप

वृत्तपत्रातून पुन्हा एकदा भारतावर निज्जरच्या हत्येचे आरोप लावण्यात आले आहेत. कॅनडाच्या पोलिसांनी हत्या आणि कट रचल्याच्या आरोपाखाली कमलप्रीत सिंह, करणप्रीत सिंह आणि करण ब्रार यांना अटक केली आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, आरोपी तत्काळ व्हिसावर वर्ष 2021 मध्ये कॅनडात आले होते. यामधील काहींचा स्टुटेंड व्हिसा होता पण कॅनडात शिक्षण घेतले नाही.

Nijjar Murder Case लॉरेंन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याचा दावा

हरियाणा आणि पंजाबमधील क्रिमिनल सिंडीकेटने सांगितले अटक करण्यात आलेल्या आरोपींचे कनेक्शन आहे. याचा संबंध कुख्यात गँगस्टर लॉरेंन्स बिश्नोई असल्याचे म्हटले जातेय. कॅनडा पोलिसांनी खलिस्तानी दहशतवादी सुखदूर उर्फ सुक्खा दुकुने याच्या हत्येमागेही लॉरेंन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचे म्हटले आहे.

निज्जरच्या हत्येत नक्की काय घडले?

गेल्या वर्षात जून महिन्यामध्ये कॅनडातील एका गुरुद्वाराबाहेर निज्जरवर गोळीबार करत त्याची हत्या करण्यात आली होती. निज्जर खलिस्तानी दहशतवादी असण्यासह खलिस्तानी टायगर फोर्सचा प्रमुख होता. गेल्या काही वर्षांपासून निज्जर कॅनडात स्थायिक होता. येथून भारताच्या विरोधात खलिस्तानी दहशतवादाला प्रोत्साहन देत होता. दरम्यान, ट्रुडो ज्यावेळी वर्ष 2018 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते त्यावेळी पंजाबमधील तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांना खलिस्तानी दहशतवाद्यांची एक यादी दिली होती. यामध्ये निज्जरचेही नाव होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने वर्ष 2020 मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केले होते.हिंसाचार, दहशतवादी हालचालींना प्रोत्साहन देणे अशा काही गोष्टींसह काही प्रकरणात पोलिसांकडून निज्जरचा शोध घेतला जात होता. भारताने हरदीप सिंह निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. याशिवाय NIA कडून निज्जरवर 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img