21 C
New York

Sushma Andhare : सुषमा अंधारे यांना घ्यायला गेलेले हेलिकॉप्टर क्रॅश…

Published:

महाड

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या फायर ब्रँड नेता सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टरचा (Helicopter Crash) अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. रायगड लोकसभा (Raigad Loksabha) मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते (Anant Geete) यांच्या प्रचारार्थ रायगड मध्ये सुषमा अंधारे आल्या होत्या. या दुर्घटनेमध्ये सुषमा अंधारे आणि पायलट सुखरूप असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

अनंत गीते यांच्या प्रचारार्थ गुरुवारी रायगड लोकसभा मतदारसंघ सुषमा अंधारे यांचे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी रात्रभर रायगड मध्येच मुक्कामी राहिल्या होत्या. बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्याला उपस्थित राहण्याकरिता आज सकाळी महाड येथून बारामतीला जाण्यासाठी हेलिपॅडवर सुषमा अंधारे आल्या होत्या. मात्र हेलिकॉप्टरचा अपघात झाला.

या घटनेत हेलिकॉप्टरचे तुकडे झाले असून मोठे नुकसान झाले. पंरतू, हेलिकॉप्टरचा पायलट सुखरुप आहे. स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img