टी20 वर्ल्डकप (T20 World Cup) स्पर्धा 1 जूनपासून सुरु होणार आहे. T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड झाली आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवड समितीने 15 खेळाडूंची निवड केली आहे. काही खेळाडूंच्या पदरात निराशा पडली आहे तर काही खेळाडूंना टी20 वर्ल्डकपमध्ये खेळण्याची उत्तम संधी मिळाली आहे. तास पाहायला गेलं तर T20 विश्वचषकासाठी अनेक खेळाडूंच्या नावाची चर्चा होती. यात या खेळाडूंना संधी मिळेल अशी अशा होती पण असं काही झालं नाही. त्या यादीतील एक नाव म्हणजे रियान पराग हा सध्या IPL मध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून खेळत आहे. आणि यात त्याची कामगिरी देखील उत्तम आहे. त्याने आपल्या फलंदाजीने विरोधकांची तोंडं बंद केली आहेत.
सुप्रिया सुळेंचा डीएनएच पवार- शर्मिला पवार
IPLमधील त्याची खेळी पाहता T20 विश्वचषकासाठी त्याची निवड व्हावी अशी अनेकांची इच्छा होती. मात्र निवड समितीकडून अनेक निकषानंतर रियान परागलाही डावलण्यात आलं आहे. रियान परागने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 49 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. परंतु राजस्थानला फक्त एका धावेने हा सामना गमवावा लागला. यानंतर रियान परागला अनेक प्रश्न विचारले गेले. यत टी20 वर्ल्डकप संघात स्थान न मिळाल्याबाबतही विचारण्यात आलं होतं.
रियान परागने सांगितलं की, “टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियात स्थान न मिळाल्याचं काहीही दु:ख नाही. मागच्या वर्षी आयपीएमध्ये खेळण्याच्या रेसमध्येही नव्हतो. मी अनेक अफवा ऐकल्या. त्यानंतर मी सोशल मीडियापासून दूर गेलो. आता मी स्वत:बाबत सोशल मीडियावर ऐकतो वाचतो तेव्हा आनंद होतो. आता लोकं माझी आठवण चांगल्या गोष्टीसाठी काढत आहेत. मी आजही कोणत्याही गोष्टींबाबत विचार करत नाही.” रियान परागचं पूर्ण लक्ष्य हे आता आयपीएलवर आहे.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सला जेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातच राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनची टीम इंडियात निवड झाली आहे. त्यावरही रियान परागने प्रतिक्रिया दिली. “संजू सॅमसनला संघात निवडल्याबद्दल आनंदी आहे. हे टीम इंडियासाठी चांगलं आहे. आम्हाला आशा आहे की. यंदा आम्ही वर्ल्डकप घरी आणू.” 10 सामन्यात रियान परागने 159.14 च्या स्ट्राईक रेटने 409 धावा केल्या आहेत. तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप 5 खेळाडूंमध्येयंदा आम्ही वर्ल्डकप घरी आणू.” रियान परागने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यात 159.14 च्या स्ट्राईक रेटने 409 धावा केल्या आहेत.