21 C
New York

Cast Reservation : आरक्षणाच्या मुद्यावर राहुल गांधींचे जनतेला मोठे आश्वासन

Published:

पुणे

काँग्रेसचे पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचाराच्या निमित्ताने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज पुण्यात सभा पार पडली. या सभेत राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली. लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Elections) देशात इंडिया आघाडीचं (India Alliance) सरकार आलं तर देशात आरक्षणाची (Cast Reservation) असलेली 50 टक्के मर्यादा हटवू, अशी मोठी घोषणा राहुल गांधी यांनी आज केली. राहुल गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपवर (BJP) सडकून टीका केली. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी आणि भाजपला संविधान मिटवायचं आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.

लढाई संविधानाला वाचवण्यासाठी आहे. लोकशाहीला वाचवण्यासाठी एकीकडे काँग्रेस पक्ष, इंडिया आघाडी संविधान वाचण्यासाठी लढत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस संविधानाला खतम करु इच्छित आहेत. हे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं आहे. या संविधानात महात्मा फुले यांचे विचार आहेत. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु ज्यांनी मिळून हिंदुस्तानच्या जनतेसोबत वर्षानुवर्षे लढाई करुन देशाच्या जनतेला दिलं. संविधानाला नरेंद्र मोदी आणि भाजप बदलण्यासाठी इच्छुक आहेत”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

याच संविधानामुळे भारताच्या गरीब, होतकरु, शेतकरी, मागास, दलित, अल्पसंख्याक, आदिवासींना अधिकार मिळतात. या संविधानाशिवाय काहीच नाही. जे काही तुमच्या हातात आहे ते सर्व देशाच्या फक्त 20 ते 25 लोकांच्या हाती चाललं जाईल असा दावा राहुल गांधींनी केला

कधी त्यांचे नेता संविधान बदलण्याबद्दल बोलतात, तर कधी बोलतात की, आरक्षण संपवून टाकणार. मोदींनी फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यावं, हे 50 टक्के आरक्षणाची मर्यादा आहे, ही मर्यादा त्यांनी कुठेही सांगावं की, ते 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवून टाकणार. त्यांनी कुठेही जावून सांगावं. आम्ही निर्णय घेतला आहे की, निवडणुकीनंतर आम्ही ही मर्यादा, ज्यामुळे कोट्यवधी नागरिकांचं नुकसान होत आहे, 50 टक्क्यांची मर्यादा आम्ही तोडून टाकू आणि बाहेर फेकून देऊ असं राहुल गांधी म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img