23.1 C
New York

Puducherry : पुदूचेरीमध्ये आखली अनोखी योजना…व्हिडिओ झाला व्हायरल!

Published:

उष्णतेच तापमान वाढत आहे. झाडांची सावली नसलेल्या रस्त्यांवर चालणाऱ्यांना उन्हाचा सामना करावा लागतोय. विशेषत: दुपारच्या सुमारास जेव्हा उष्णता खूप जास्त असते. उन्हापासून बचावासाठी पुदूचेरी (Puducherry) सार्वजनिक कल्याण विभागाने कडक उन्हात प्रवास करणाऱ्या लोकांना दिलासा देण्यासाठी ट्रॅफिक सिग्नलवर हिरवी छत बसवली. ट्रॅफिक सिग्नलसाठी उभे राहिलेल्या काही मीटर अंतरापर्यंत हे हिरवे छत टाकण्यात आले. लोकांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी ही उपाययोजना राबवण्यात आली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


नेटकऱ्यांकडून मुंबईत ही योजना राबवण्याबाबत चर्चा सुरु आहे. तर काहींनी दिल्ली, केरळ येथे देखील ट्रॅफिक सिग्नल दरम्यान हिरवे छत टाकण्याची मागणी होत आहे. जेणेकरून ट्रॅफिक सिग्नल पाळताना उन्हाचा सामना करावा लागणार आहे. व्हिडिओ प्रतिक्रिया देत, मुंबईकरांनी स्थानिक अधिकाऱ्यांना पुदूचेरीपासून प्रेरणा घेऊन आपल्या शहरातही ही यंत्रणा आणण्याचे आवाहन केले. केरळमधील लोकांनीही त्यांच्या सरकारला ते लागू करण्यास सांगितले. या योजनेबद्दल पुदूचेरी सरकारचे कौतुक करण्यात आले आहे. त्यांनी वापरलेल्या हिरव्या छताविषयी सर्वत्र कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img