3.8 C
New York

Poonam Mahajan : प्रमोद महाजनांच्या आठवणीत रमल्या पूनम महाजन

Published:

भाजपमध्ये दोन दिग्गजांजी जोडगोळी हे कायम समीकरण राहीलं आहे. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे ही एक जोडगोळी राहीली आहे. हे दोघही आता हयात नाहीत. मात्र, त्यांच्या नावाचा राजकारणात एक कायम आदर राहीलेला आहे. मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे या दोन्ही भगीनी राजकारणात आहेत. तर, प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजनही (Poonam Mahajan) राजकारणात आहेत. परळी विधानसभेला पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना अनेकवेळा पक्षाने संधी नाकारली असे प्रसंग आले. मात्र, बीड लोकसभेची त्यांना संधी दिली. तर, दुसरीकडे विद्यमान खासदार असलेल्या पूनम महाजन यांना मात्र यावेळी भाजपने उमेदवारी नाकारली आहे. त्याची काय कारण आहेत हे ठोसपणे समोर आली नाहीत. मात्र, पूनम महाजन यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत. त्यांनी आजही एस्क (ट्वीटरवर)पोस्ट करून आपल्या मनातील खदखद व्यक्त केलेली पाहायला मिळालं.

‘तो’ कलाकार भडकला, वाघ यांच्यावर दावा ठोकणार

Poonam Mahajan आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव या देशाच्या सेवेसाठी

पूनम महाजन यांनी आपल्या पोस्टमध्ये दिवंगत प्रमोद महाजन यांची आढवण काढली आहे. तसंच, प्रमोद महाजन यांचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत आज प्रमोद महाजन यांच्या स्मृतीदिनी अभिवादन केलं आहे. दरम्यान, आपल्या तिकीट कापल्यानंतर त्यांनी पोस्ट करून आपलं मत व्यक्त केलं होत. “मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून मला 10 वर्षे खासदार म्हणून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. केवळ खासदार म्हणूनच नव्हे तर एक मुलगी म्हणूनही माझ्यावर प्रेम केल्याबद्दल परिसरातील कुटुंबियांची मी सदैव ऋणी राहीन आणि हे नाते चिरंतन टिकून राहो, अशी आशा आहे. माझे आराध्य दैवत, माझे वडील दिवंगत प्रमोद महाजन जी यांनी मला ‘आधी राष्ट्र, मग आपण’ हा मार्ग दाखवला, मी आयुष्यभर याच मार्गावर चालत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव या देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल.’ असं त्या म्हणाल्या होत्या.

Poonam Mahajan घाटकोपर पश्चिममधून पहिल्यांदा पराभव

प्रवीण महाजन यांनी आपले भाऊ प्रमोद महाजन यांची मे 2006 मध्ये हत्या केली. त्यानंतर त्यांचा मुलगा राहुल महाजन राजकारणात येतील असं बोललं जात होतं. परंतु, त्यांना राजकारणात रस नसल्यामुळे प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन राजकारणात आल्या. 2009 मध्ये पूनम महाजन यांनी घाटकोपर पश्चिममधून पहिल्यांदा निवडणूक लढवली. मात्र, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला. 2019 च्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला होता. या वेळी मात्र, त्यांना तिकिट नाकारण्यात आल असून त्या जागेवर वकिल उज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img