19.7 C
New York

Mumbai Metro : मतदारांना मेट्रोची खास सवलत मतदानादिवशी तिकीटांवर 10 टक्के सूट

Published:

महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होतेय. दोन टप्प्यात मतदान पार पडलं असून 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यानंतर चौथा आणि पाचवा टप्पा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. पाचव्या टप्प्यात मुंबईतील 6 लोकसभा क्षेत्रांसाठी 20 मे रोजी मतदान होईल. या दिवशी मुंबई मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 च्या सर्व प्रवाशांना तिकिटावर 10% सवलत मिळणार आहे. (Mumbai Metro) मतदारांना मेट्रोची खास सवलत मतदानादिवशी तिकीटांवर 10 टक्के सूट महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने घेतला आहे.

Mumbai Metro पहिल्या दोन टप्प्यात मतदानाचा टक्का कमी राहिला.

अन्यथा कोल्हेंनी निवडणुकीतून बाहेर पडावं

कारण लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मतदार पार पडणार आहे. सध्या मुंबईतील लोकसभेच्या सहाही जागेवरील महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. विशेष म्हणजे पहिल्या दोन टप्प्यात मतदानाचा टक्का कमी राहिला. त्यामुळे प्रशासनाकडून विविध सवलत आणि जाहिरातींच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्यासाठी आकर्षित करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. अशीच सवलत मुंबई मेट्रो प्रशासाने प्रवाशांना दिली आहे.

Mumbai Metro 10% सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय मेट्रोने घेतला

लोकसभा निवडणूक 2024च्या पाचव्या टप्प्यातील मतदान मुंबईत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने प्रवाशांना विशेष सवलत दिली आहे. मुंबई मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 च्या सर्व प्रवाशांना 20 मे, 2024रोजी प्रवासी तिकिटावर (मूळ तिकिट दरावर) 10% सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार, (Mumbai Metro Ticket commuters will get 10 percent discount on tickets on election day) मेट्रोच्या प्रवाशांना ही सवलत मुंबई मेट्रो 1 कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, पेपर तिकीट अशा सर्व माध्यमातून देण्यात येणार आहे.

कोल्हेंचं आढळरावांना प्रतिआव्हान

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img