23.1 C
New York

Mango: तुम्ही जो आंबा खाताय तो कृत्रिम आहे की नैसर्गिक?

Published:

आंबा (Mango) म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. कारण आंबा हे सर्रास सगळ्यांच्याच आवडीचं फळ आहे. आंब्याला फळांचा राजा असंही म्हणतात. सध्या आंब्याचा हंगाम सुरु आहे. विविध ठिकाणच्या बाजारात आंबा दाखल होत आहे. सरासरी फेब्रुवारी महिन्यात वाशीच्या एपीएमसी बाजारात कोकणचा राजा असलेल्या कोकणातील हापूस आंब्याची आवक होण्यास सुरुवात होत असते.

यंदा अवकाळी पाऊस आल्याने जवळपास 80 टक्के मोहोर गळून पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याच बरोबर सध्या बाजारात कृत्रिमरित्या तयार करण्यात येणारा आंबा देखील सर्रास विकला जात आहे. कृत्रिमरित्या आंबा पिकविण्यासाठी रसायनांचा वापर होत असल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. मार्च महिन्याची चाहूल लागताच बाजारात दिसणारा पिवळाधमक आंबा लक्ष वेधून घेतो, परतु तो कृत्रीमरित्या पक्व करण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जात आहे.

अशा द्रव्यांच्या वापरामुळे फळांना पिवळाधमक रंग आणि तकाकी येत असतली तरी त्याचे मानवी आरोग्यावर भयंकर परिणाम होत आहेत. आणि या आंब्यांच्या किंमती देखील बाजारात कमी आहे. आपण पाहायला गेलं तर नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या आंब्यांच्या किंमती गगनाला भिडणाऱ्या आहेत. आणि कृत्रिमरित्या तयार केला जाणारा आंबा हा आपल्याला बाजारात प्रचंड कमी भावात उपलब्ध होत आहे.

आपण पाहिलं तर दरम्यान मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा डझनमागे हापूस आंब्याचे दर ३०० रुपयांनी उतरले आहेत. तसेच आंब्याची वाढती आवक त्यामुळे हापूस आंब्याचे दर उतरले आहेत. त्यामुळे हापूस आंबा खाणाऱ्यांना चांगलीच संधी आली आहे. परंतु आता तो आंबा नैसर्गिक आहे की कृत्रिम हे ओळखण्यासाठी ग्राहकांची धन्दाल उडताना पाहायला मिळत आहे. आता आपण कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याचा रंग एकसमान असतो आणि नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्यापेक्षा जास्त पिवळा किंवा केशरी दिसू शकतो.

पिकण्याच्या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे त्यांचे थोडे चमकदार स्वरूप देखील असू शकते. तसेच नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याला गोड, फळांसारखा वास असतो, तर कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याला रसायने किंवा वेगळा वास असू शकतो. जर आंब्याला विचित्र किंवा खराब वास आला असेल तर तो कृत्रिमरित्या पिकविलेला आंबा असू शकतो. अशा प्रकारे आपण आंबा नैसर्गिक आहे की कृत्रिम हे ओळखू शकतो

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img