23.1 C
New York

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल

Published:

धारवाड

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे विकसित भारताचे व्हीजन आहे. त्यांचा जन्म राष्ट्रनितीसाठी झालाय. याउलट विरोधकांकडे लाँच न होणारा युवराज आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काँग्रेसवर केली. धारवाड लोकसभा (Dharwad Lok Sabha) मतदार संघाचे भाजपचे उमेदवार प्रल्हाद जोशी आणि कारवार लोकसभा मतदार संघाचे भाजपचे (BJP) उमेदवार विश्वेशवर कुमार हेगडे कागेरी यांच्या प्रचारासाठी खानापूर येथे आणि यांच्या प्रचारार्थ अलनवार येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

ही निवडणूक देशाच्या प्रगती आणि विकासाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली. त्यांनी संकल्प केलाय की तिसऱ्या क्रमांकावर देशाची अर्थव्यवस्था आली पाहिजे. कट, कमिशन आणि करप्शनवाले एकीकडे आहेत तर दुसरीकडे बेदाग असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. इंडिया आघाडी मोदी व्देषाने पछाडलेले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आपली राम सेना आहे, त्यांची रावण सेना आहे. अयोध्येत राम मंदीर उभारले आणि मोदी यांनी करोडो रामभक्तांचे स्वप्न पूर्ण केले. चोविस तास काम करणारा देशभक्त आणि दुसरीकडे गरम वाटले की परदेशात जाणारे राहुल गांधी यातील फरक मतदारांनी ओळखायचा आहे. १० वर्षांत मोदींनी एकही सुट्टी घेतली नाही. आईचे दु:ख बाजूला करुन देशसेवा करणारे मोदी कुठे आणि आईचा पदर धरून राजकारण करणारा राहुल गांधी कुठे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

दहा तोंडाचे रावण एकत्रित आले. मात्र तरीही नरेंद्र मोदी यांना हरवणे मुश्किल नाही तर नामुमकिन है, असे ते म्हणाले. मोदींवर जितके आरोप विरोधकांनी केले तितक्या त्यांच्या जागा कमी झाल्या. लोकशाही धोक्यात, संविधान बदलणार, अशा प्रकारचे खोटा प्रचार केला जातोय. पण सूज्ञ जनता विरोधकांचे डिपॉझिट जप्त करेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर काँग्रेसने सर्वाधिक अन्याय केला. काँग्रेसने बाबासाहेबांचा निवडणुकीत पराभव केला. ५० वर्ष काँग्रेस सत्तेत असताना संविधानाची आठवण झाली नाही. २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिन सुरु केला. बाबासाहेबांची आठवण त्यांचे काम आणि त्याग चिरंतर ठेवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे. जोवर चंद्र आणि सूर्य आहेत तोवर बाबासाहेबांचे संविधान राहणार, अशी ग्वाही मोदी यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, कर्नाटकमधील सरकार ओबीसीचे आरक्षण काढून कोणाला तरी देणार आहेत. काँग्रेसने निवडणुकीत अनेक आश्वासने दिली होती पण ती पूर्ण केली नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. हुबळीमध्ये मुली सुरक्षित नाहीत. राज्यातील जनतेची सुरक्षा, जनतेचे हित मुख्यमंत्र्यांचे प्राथमिक काम आहे. भारतातील जनता आता मजबूर नाही, मजबूत आहे. मोदी डायरेक्ट सर्जिकल स्टाइक करतात ते लोकांना जागा दाखवून देतात, असे ते म्हणाले.

भाजपच्या पाच आमदारांना अटक करण्याचा कट महाविकास आघाडी सरकारने रचला होता. मात्र अन्यायाला वाचा फोडण्याची शिकवण बाळासाहेबांनी आम्हाला दिली. आम्ही धाडस केले. परिणामांची, सत्तेची पर्वा केली नाही आणि मंत्रीपदाला लाथ मारुन निर्णय घेतला आणि सरकार बदलले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या उठावानंतर केवळ भारतात नव्हे तर जगातील ३२ देशांमध्ये एकनाथ शिंदे यांना ओळखतात. हा पॅटर्न कर्नाटकात राबवयाचा असेल तर पूर्ण सहकार्य करु कारण आपल्याला अनुभव आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img