21 C
New York

Chhagan Bhujbal : मोदींचे ठाकरेंबाबत वक्तव्य, भुजबळांची सावध भूमिका

Published:

उद्धव ठाकरेंना अडचणीत मदत करणारा पहिला मीच असेल, असं वक्तव्य नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) काल (दि. 2) एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. त्यानंतर आता पुन्हा उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) भाजपनं मैत्रीचे दरवाजे खुले केले आहेत का? अशा चर्चांना जोर धरला असून, मोदींच्या विधानावर आता महायुती मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठं विधान केले आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Chhagan Bhujbal On PM Modi Friendship Offer To Uddhav Thackeray) ”भुजबळ खळखळून हसले आणि म्हणाले… मोदींनी मुलाखतीत ठाकरेंबाबत केलेल्या विधानाबाबत बोलताना भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना भुजबळ पहिल्यांदा खळखळून हसले आणि म्हणाले की, राजकारणात कधी काय होईल, ते सांगता येत नाही. आजचा मित्र उद्या शत्रू तर, आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकतो.

Chhagan Bhujbal पवारांनी पण सोडून गेलेल्या नेत्यांसाठी एक खिडकी उघडली आहे

मध्यंतरी पवार साहेबही एका ठिकाणी बोलले होते की, ठिक आहे आमचे काही नेते सोडून गेले असतील पण जर ते परत येत असतील तर निश्चितपणे सकारात्मक विचार करू असे म्हणत त्यांनीपण एकप्रकारे खिडकी उघडी केलेली आहे. त्याचप्रमाणे मोदींनीही वेगळ्याप्रकारचा संदेश शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांना मोदींनी दिल्याचे भुजबळ म्हणाले. पण त्यांच्या विधानावरून असचं होईल हे काही ठामपणे सांगता येत नाही असेही भुजबळांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

कोकणात मोदी अन् राणेंचं कॉम्बिनेशन चालणार ?

Chhagan Bhujbal मोदींचे पवारांवर विधान भुजबळांची सावध पावलं

कालच्या मुलाखतीत मोदींनी पवार कुटुंबियांच्या वारसाबाबतही भाष्य केले होते. शरद पवार जर घर सांभाळू शकत नाही तर ते देश काय सांभाळणार असे म्हटले होते. तसेच राष्ट्रवादीमध्ये जो वारसाचा वाद आहे तो त्यांचा घरगुती वाद असल्याचे म्हचले होते. याबाबत भुजबळांना विचारले असता भुजबळांनी सावध भूमिका घेत उत्तर दिले. ते म्हणाले की, मी यावर काही बोलू शकत नाही असे म्हणत देश सांभाळू शकत नाही वगैरे हे मोदींचे वैयक्तिक मत असल्याचे भुजबळ म्हणाले. पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, पवारसाहेबांनी संरक्षण मंत्रीपद अतिशय चांगल्यारितीने संभाळले होते. एवढेच नव्हे तर, ज्यावेळी रद पवार कृषिमंत्री झाले त्यावेळी निश्चितच देशातील कृषि उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे भुबळांनी अधोरेखित केले.

सरनाईक यांच्या पुतण्याचा कार अपघात

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img