नेहमी काही ना काही कारणांनी चर्चेत राहणारी पॉप सिंगर ब्रिटनी स्पिअर्स (Britney Spears) आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ती व्यक्तिगत आयुष्यातील प्रसंगामुळे चर्चेत आली आहे. बॉयफ्रेंडशी झालेल्या भांडणांनंतर लॉस एंजलिस (Los Angeles) येथील एका हॉटेलमधून ती विचित्र अवस्थेत बाहेर पडल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
ब्रिटनी २ मेच्या मध्यरात्री तिचा बॉयफ्रेंड पॉल रिचर्ड याच्यासोबत लॉस एंजलिसमधील एका बड्या हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेली होती. तिथे दोघांमध्ये वाद झाला. वाद इतका टोकाला गेला कि दोघांमध्ये मारामारी झाली. त्यानंतर ब्रिटनी नको त्या अवस्थेत बाहेर पडली. त्यावेळी तिच्या पायात चपलाही नव्हत्या. ती टॉपलेस होती. शरीराभोवती तिने अर्धवट ब्लँकेट गुंडाळले होते आणि छातीवर उशी धरली होती.
हेही वाचा : अभिजीत बिचुकले भरणार कल्याण लोकसभा मतदारसंघातून अर्ज…
Britney Spears ब्रिटनच्या पायाला जखमा
तिची हि अवस्था पाहून हॉटेलचे सुरक्षा रक्षक तिच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी अँब्युलन्स बोलावून घेतली, मात्र ब्रिटनीने अँब्युलन्समधून जाण्यास नकार दिला. बॉयफ्रेंडशी झालेल्या मारामारीत ब्रिटनच्या पायाला जखमा झाल्या असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आहे. सध्या ब्रिटनीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Britney Spears : मी विचलित झालेली नाही
ब्रिटनी हॉटेलमधून बाहेर पडताना पापाराझींनी तिला पाहिले आणि तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या साऱ्या प्रकरणावर ब्रिटनीने एक पोस्टही लिहिली आहे. यात तिने, मी रोज अशा प्रसंगांना सामोरे जाते. यातून माझ्यात विपरीत परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ आले आहे. मी या प्रसंगाने जराही विचलित झालेली नाही, असे म्हटले आहे.