23.1 C
New York

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या ट्विटवरून रंगला राजकीय वाद… भाजप विरुद्ध आदित्य ठाकरे! नेमकं प्रकरण काय?

Published:

बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते त्यांना मिळालेले अनुभव, नवे प्रोजेक्ट्स आणि नवी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात. मात्र अमिताभ बच्चन यांनी केलेल्या ट्विटमुळे चांगलीच वादाची ठिणगी पेटली आहे. अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी एक ट्वीट केले. ज्यात त्यांनी दक्षिण मुंबईत आले असताना त्यांनी कोस्टलरोडद्वारे मरीनड्राइव्ह ते जुहू प्रवास 30 मिनिटात केला, याची माहिती चाहत्यांना देत प्रशूंसा केली. ह्या ट्विटमध्ये त्यांचा प्रवास किती सुखकर आणि सोयीस्कर झाल्याची माहिती दिली. त्यावर व्यक्त होताना वाह ! क्या बात है ! साफ सुथरी, नयी बढिया सडक कोई रुकावट नही.. याबाबत त्यांनी ‘X’ वर पोस्ट केली. त्यांनी हा प्रवास करतानाची व्हिडिओ देखील पोस्ट केली होती.


मात्र त्यांच्या या ट्विटमुळे चांगलाच राजकीय वाद पेटला आहे. अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केलेल्या ट्वीटला भाजप (BJP) महाराष्ट्रकडून आज हमारे पास ‘कोस्टल रोड’ है…असे म्हणत अमिताभ यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळेच मुंबईकरांचा प्रवास वेगवान होत असल्याचा दावा केला भाजपने केले.


या ट्विटला प्रतिउत्तर देत आदित्य ठाकरेनी भाजपला डिवचले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackarey) यांनी भाजपने केलेला दावा खोडून काढला आहे. आदित्य ठाकरेंनी कोस्टल रोडच्या निर्मितीपासून ते आतापर्यंतचा घटनाक्रम सांगितला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोस्टल रोडचं काम किती वेगाने सुरू होतं हे सांगताना भाजपचं यात काही योगदान नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी अधोरेखित केले. त्याचसोबत आदित्य यांनी काही फोटोज पोस्ट करत कोस्टल रोडसाठी काय काय उपाययोजना, यंत्रणा उभी केली याची माहिती ‘X’वर पोस्ट केली.


मात्र अमिताभ बच्चन यांच्या ट्विटमुळे नवा राजकीय वाद रंगला आहे. भाजप विरूद्ध आदित्य ठाकरेंमध्ये सध्या कोस्टल रोडचं श्रेयावरून राजकीय सामना रंगलेला पाहायला मिळतोय. भाजपकडून कोस्टल रोडचं श्रेय घेतलं जात असल्याचे लक्षात आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी बच्चन यांना टॅग करत पोस्ट केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img