8.4 C
New York

Bharti Singh: भारती सिंग रुग्णालयात दाखल! तिला अश्रू झाले अनावर…

Published:

प्रसिद्ध कॉमेडियन आणि निवेदक भारती सिंग सध्या (Bharti Singh) चर्चेत आली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे समजते. तिच्या नवीन व्लॉगमध्ये, अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना पोट दुखीबाबत सांगितले. वेदना कमी न झाल्याने अखेरीस तिने हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारती सिंगने तिच्या चाचण्या केल्या आणि तिच्या पित्ताशयात खडे असल्याचे कळले. त्यामुळे आता डॉक्टर त्यावर आवश्यक उपचार करत असून तिच्यावर पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. हि माहिती भारतीने तिच्या Vlog मध्ये दिली. तिने रुग्णालयात दाखल झालं असल्याचं सांगितलं.


पित्ताशयावर शस्त्रक्रिया असल्यामुळे भारती रुग्णालयात आहे. त्यामुळे ती भावुक झाली आहे विडिओ बनवून चाहत्यांनासोबत शेअर केला आहे. व्लॉगमध्ये तिने तिचा मुलगा गोलाला मिस करत असल्याचे सांगितले. त्यावेळीस ती भावूक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले. भारती रुग्णालयात असल्यामुळे तिचा मुलगा तिला घरभर कसा शोधत होता. भारतीने मुलाविषयी काळजी व्यक्त केली आहे. लवकरच संपेल या आशेने, भारती म्हणाली की “मुलासोबत पुन्हा भेटण्यास उत्सुक आहे.” व्हिडिओमध्ये तिचा पती हर्ष लिंबाचिया देखील दिसत होता. भारतीवर शस्त्रक्रिया होणार असल्याने तो काळजीत दिसला.


भारती सिंग एक लोकप्रिय चेहरा आहे आणि प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करण्यात यशस्वी झालेल्या सर्वात यशस्वी विनोदी कलाकारांपैकी एक आहे. कॉमेडियन इंदूस्ट्रीत ती सर्वात सर्वात जास्त पगार घेणारी देखील आहे. भारती सिंग एक यशस्वी YouTube चॅनल देखील चालवते. ती तिच्या आयुष्याची झलक देणारे तिचे Vlog शेअर करते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img