मुंबई
लोकसभा निवडणुकीची (Loksabha Elections) धामधूम सुरु असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) एका नेत्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आला आहे. ठाण्यातील (Thane) मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्या विरोधात लोकमान्य टिळक पोलीस (Lokmanya Tilak Police) स्टेशन मध्ये खंडणीचा (Extortion) गुन्हा दाखल झाला आहे. सराफा व्यवसाय शैलेश जैन (Shailesh Jain) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा शैलेश जैन यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे. झवेरी बाजार येथील जेके ज्वेलर्स या कार्यालयात हिशोबासाठी बोलवले होते त्यावेळी अविनाश जाधव यांच्या सहकारी अंगरक्षक व सहा ते सात व्यक्तींनी जैन यांचा मुलगा सोमिल जैन याला मारहाण केली. अविनाश जाधव यांनी पाच कोटी रुपयांची खंडणी मागितले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारदार सराफा व्यावसायिक शैलेश जैन यांच्या तक्रारीनंतर वैभव ठक्कर व विनोद जाधव यांच्या विरोधात भादवी कलम 385, 143, 147, 323, 120B अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.