19.7 C
New York

Gurucharan Singh: गुरुचरणच्या बेपत्ता होण्यावर असित मोदींची प्रतिक्रिया…

Published:

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. तो २२ एप्रिलपासून बेपत्ता झाल्याची माहिती आहे. अभिनेत्याच्या वडिलांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार २६ एप्रिल रोजी दिल्ली पोलीस स्थानकात केली होती. मध्यंतरी त्याचा सिसिटीव्ही फुटेज व्हायरल झाला होता ज्यात अभिनेत्याचं अपहरण झाल्याची शक्यता आहे. मात्र, ११ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अभिनेत्याबाबत ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ चे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांनी या प्रकरणांवर प्रतिक्रिया दिली आहे.


एका मुलाखतीत असित यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, गुरुचरण सिंगवर आई-वडिलांची जबाबदारी होती. गुरुचरण बेपत्ता होण्याची खूप धक्कादायक बातमी आहे. त्याचं आपल्या कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल एकमेकांना काही सांगावं इतकी आमच्यात जवळीक नव्हती, पण मला जितकं त्याच्याबद्दल माहित आहे, त्यावरून तो खूप धार्मिक होता, असं असित मोदी म्हणाले.


पुढे असित म्हणाले, “गुरुचरण सिंगशी खूपदा भेट व्हायची. तो बेपत्ता झालाय हे ऐकून मला धक्का बसला. सध्या पोलिसांकडून तपास सुरु आहे. मी देवाला प्रार्थना करतो की तो सुरक्षित असेल आणि त्याने फोन उचलावे,” असं असित म्हणाले.
तसंच अभिनेत्याच्या बेपत्ता होण्यावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ तारखेला तो पालम येथील त्याच्या घरापासून फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावर होता. तिथेच जवळच्या एटीएममधून त्याने पैसेही काढले होते. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला व अजून त्याच्याबद्दल कोणतीची माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. याबाबत तपास सुरु आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img